ठाणे : अपुरा पाणी पुरवठा, कचरा विल्हेवाटी संबंधिच्या समस्या आणि दररोज होणाऱ्या अजस्त्र अशा वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना ठाण्यातील प्रशासकीय यंत्रणांना अक्षरश: घाम फुटला असतनाच, ठाणे ते ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामामुळे या यंत्रणाचा ताप आणखी वाढणार आहे. या कामासाठी दररोज तीन ते चार लाख लीटर पाणी लागणार आहे. तसेच दररोज तीनशे ट्रक इतकी माती या मार्गाच्या निर्मितीसाठी खणली जाणार आहे. याशिवाय, या प्रकल्पाच्या कामासाठी स्वतंत्र मार्गिका असावी, अशी मागणी मुंंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडे केली आहे. ही सगळी व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक प्राधिकरणापुढे असणार आहे. 

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्ग हा राज्य शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून प्रकल्पाचे काम करण्यात येत असून या प्रकल्पामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर १२ मिनिटात पार करणे शक्य होणार आहे. घोडबंदर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डोंगराखालून हा मार्ग तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. या प्रकल्प कामातील अडथळे दूर करण्याबरोबरच विविध परवानग्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच एक बैठक पार पडली. या बैठकीस, अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहायक संचालक, नगर रचना संग्राम कानडे, उपायुक्त (उद्यान) मनोहर बोडके, उपनगर अभियंता विकास ढोले आदी उपस्थित होते. या बैठकीत ठाणे महापालिका क्षेत्रातील भूसंपादन, अतिक्रमणे हटविणे, वृक्ष प्राधिकरणाकडून आवश्यक परवानगी आदी ठाणे महापालिकेशी निगडीत विषय एमएमआरडीए आणि बांधकाम कंपनीच्या प्रतिनिधींनी आयुक्त सौरभ राव यांच्या समोर मांडले.

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
badlapur and panvel, tunnel road, mumbai vadodara highway
पनवेल ः अपघाताविना ‘त्यांनी’ खणला ४ किलोमीटरचा बोगदा
Bhagwan Rampure on Statue Collapse
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : “चूक शिल्पकाराची नाही, मला दुःख आहे की…”, प्रख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांचा सरकारवर गंभीर आरोप
First double decker flyover in mira bhayandar opened for traffic
मिरा-भाईंदरमधील पहिला डबलडेकर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला; वाहतूक कोंडी सुटणार
Lalbaugcha raja 2024 darshan mumbai devotees get pushed shoved at lalbaugcha raja amid stampede like situation
लालबागच्या राजाच्या दर्शनाला जाताय? ‘हा’ VIDEO पाहा अन् तुम्हीच सांगा चूक भाविकांची की कार्यकर्त्यांची?
Amruta Fadnavis
Amruta Fadnavis : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “त्यापेक्षाही मोठा पुतळा…”

हेही वाचा >>>Badlapur sexual assault : ‘त्या’ आरोपीला न्यायालयीन कोठडी, आणखी कलमांचा समावेश, शाळेच्या अध्यक्षांसह सचिव फरार

पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात मोठे उत्खन्न

ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामादरम्यान दररोज तीनशे ट्रक माती निघणार असून ती टाकण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणीची मागणी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने पालिकेकडे बैठकीत केली. या प्रकल्प स्थळी दररोज तीन ते चार लाख लीटर इतका पाणी पुरवठा करण्याची मागणी पालिकेकडे यावेळी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केली. तसेच माती वाहू वाहने, टँकर तसेच इतर वाहनांमुळे शहरातील मार्गांवर कोंडीची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाहतूकीसाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्याचीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेट देवून पाहणी केलेली आहे. त्यानुसार, परवानगीबद्दलचे विषय मार्गी लागतील. जलवाहिनी स्थलांतर, उद्यानासाठी वेगळा प्रवेश मार्ग या बाबींबाबत एकत्रित पाहणी करून लगेच निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राव यांनी बैठकीत स्पष्ट केले. भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी लागणार आहे. त्यासाठी ठाणे महापालिकेच्या एसटीपीमधील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली. त्यासंदर्भात, महापालिकेच्या बांधकाम विभागाशी समन्वय साधून पाण्याचे नियोजन करण्याची ग्वाही देण्यात आली.

हेही वाचा >>>कल्याणमध्ये अवैध मांस विक्रेत्यांवर बाजार परवाना विभागाची कारवाई

ठाणे महापालिकेला राज्य शासनाकडून भिवंडी येथील आतकोली भागात कचराभुमीसाठी जागा उपलब्ध झाली असून तिथे पालिकेला मातीचा भराव टाकावा लागणार आहे. येथेच ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाच्या कामादरम्यान निघणारी माती टाकायची का आणि वाहतूकीच्या दृष्टीने ते शक्य आहे का यासह इतर जागेंचा पालिकेने शोध सुरू केला आहे. तसेच एमएमआरडीएने केलेल्या मागणीप्रमाणे पालिकेला एसटीपीमधून पाण्याचा पुरवठा करणे शक्य असून हेच पाणी प्रकल्पस्थळी देण्याचे पालिकेने निश्चित केले आहे. पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरचा वापर केला तर रस्त्यावर टँकरचा भार वाढून कोंडी होऊ शकते. यामुळे तात्पुरत्या पाईपलाईनद्वारेच या पाण्याचा पुरवठा करण्यावर पालिका प्रशासन विचार करित आहे, अशी माहिती पालिका सुत्रांनी दिली.

ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी काही महिन्यांपुर्वी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिरसरात सिमेंट काँक्रीट तयार करण्याचा (आरएमसी) प्रकल्प उभारण्यात आला होता. या प्रकल्पामुळे गंभीर आजार होण्याची भिती व्यक्त करत नागरिकांनी प्रकल्पास विरोध केला होता. त्यानंतर हा प्रकल्प बंद करण्यात आला होता.

प्रकल्पाची माहिती

ठाणे – बोरिवली भुयारी मार्ग

प्रकल्पाची लांबी : ११.८४  किमी

बोगद्यांची लांबी : १०.८  किमी

अंदाजे खर्च : १३,२००  कोटी