ठाणे : मुस्लिम धर्मियांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी येथील एका २० वर्षीय मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा अहमदनगर येथील तोफखाना पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे ही वाचा…ठाणे: घोडबंदर भागात अवजड वाहने उलटल्याने कोंडी, वाहनांच्या रांगा

काही दिवसांपूर्वीच आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम धर्मियांबाबत वादग्रस्त विधान केले होते. या विधानावरून नितेश राणे यांच्याविरोधात आता गुन्हे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. भिवंडी येथील एका तरुणाने नितेश राणे यांच्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मुस्लिम धर्मियांबाबतीत बदनामीकारक घोषणा देऊन राणे यांनी धार्मिक भावना दुखावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नितेश राणे यांनी हे वक्तव्य अहमदनगर येथे केल्याने तेथील तोफखाना पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०२, ३५१ (२), ३५२, ३५३ (२) प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane case registered against mla nitesh rane for making objectionable statements about muslims sud 02