ठाणे : ठाकुर्ली ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सोमवारी दुपारी धिम्या मार्गावरून धावत असणाऱ्या लोकलची अचानक ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळित झाली होती. याचा परिणाम रात्री उशिरापर्यंत दिसून येत होता. लोकल अर्धा उशिराने धावत असल्याने ठाणे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोमवारी दुपारी ठाकुर्ली कल्याण स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील जाणाऱ्या लोकलची ओव्हरहेड वायर तुटली होती. ही वायर तुटताना मोठा आवाज झाला आणि परिसरात धूर पसरला. या बिघाडामुळे मध्य रेल्वे ची वाहतूक एक ते दीड तासासाठी ठप्प झाली होती. सुमारे दीड तासानंतर या बिघडाची दुरुस्ती करण्यात आली. मात्र याचा तांत्रिक बिघडाचा परिणाम सोमवारी रात्री उशिरापर्यंत कायम होता. सायंकाळी सहा वाजल्यापासून ठाणे स्थानकात गर्दी झाली होती.

हेही वाचा : Overhead Wire Break : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेचा खोळंबा

कल्याण दिशेकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये तुडुंब गर्दी होती. या लोकल गाड्यामध्ये चढण्यासाठी प्रवाशांची चढाओढ सुरू होती. फलाट क्रमांक दोन तीन पाच प्रवाशांनी तुडुंब भरले होते. या लोकल मध्ये अनेकजण लटकत जीवघेणा प्रवास करत होते. तर संपूर्ण फलाटावर, पुलावर प्रवाशांची चेंगराचेंगरी सदृश दिसून आली.