विद्या प्रसारक मंडळाचे के.ग.जोशी कला आणि ना.गो.बेडेकर वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या प्रा.रुपेश यशवंत महाडीक यांना कोकण ग्राम विकास संस्थेतर्फे “आदर्श अध्यापक पुरस्काराने ” सन्मानित करण्यात आले. मराठी ग्रंथ संग्रहालय,ठाणे येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात गप्पागोष्टीकार जयंत ओक यांच्या हस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात आला. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर आणि डॉ.महेश बेडेकर विश्वासाने तसेच प्राचार्या डॉ.सुचित्रा नाईक यांनी अभिनंदन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा अल्प परिचय

प्राध्यापक रुपेश महाडीक यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण,सोबतच सेट, नेट आणि एलएलबीचे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विद्यार्थीप्रिय पण त्याचसोबत शिस्तप्रिय असणारे प्रा.रुपेश महाडीक हे मागील १४ वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विद्यार्थी दशेपासूनच अनेक स्पर्धा उपक्रमांमध्ये आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा, नृत्य,नाटक,पथनाट्य,वक्तृत्व अशा विविध स्पर्धांमधून त्यांनी उत्तम यश प्राप्त केले.मुंबई विद्यापीठाच्या ‘उडान’ या कार्यक्रमात महाडीक सरांनी लेखन ,दिग्दर्शिन आणि अभिनय केलेल्या स्किटला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते.अनेक आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत त्याचसोबत नावाजलेल्या विविध वक्तृत्व स्पर्धांमध्ये त्यांनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने गौरव

विद्यार्थ्यांचे उत्तम मार्गदर्शक

विद्यार्थ्यांचे आणि त्यांचे नाते नेहमीच जिव्हाळ्याचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांची कोणतीही अडचण,संकट असो,त्यांना हमखास मार्गदर्शन मिळेल या विश्वासाने अनेक विद्यार्थ्यांनी सरांकडे धाव घ्यावी आणि अगदी गोवर्धन करंगळीवर लीलया उचलावा तसे विद्यार्थ्यांना संकटातून,समस्येतून मार्ग सहज दाखवावा अशा प्रकारचे भावबंध त्यांचे राहिले आहेत. विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार करावा,कुटुंब-समाज यांचा समतोल राखत उत्तुंग यश प्राप्त करावे,आत्मविश्वासाने,संयमाने परिस्थितीवर मात करत माणूस म्हणून चांगले आयुष्य जगावे,त्याचसोबत मैत्रीचे जीवनातील महत्त्व, अशा अनेक गोष्टींचे सिंचन विद्यार्थ्यानमध्ये करत आदर्श संस्कारक्षम पिढी घडविण्याचे कार्य सर अव्याहतपणे गेली अनेक वर्ष करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane college professor rupesh mahadik honored with adarsh teacher award scj