ठाणे : ठाण्यात विज्ञान केंद्र उभारणीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करताच, त्याच्या अंमलबजावणीसाठी ठाणे महापालिका प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. विज्ञान केंद्र साकारण्याबाबत मार्गदर्शन घेऊन त्याचा आराखडा तयार करण्यासाठी आयुक्त अभिजीत बांगर यांनी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची नुकतीच भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेदरम्यान ठाणे शहरातील नियोजित जागेवर विज्ञान केंद्र उभारण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करुन युद्धपातळीवर कामास सुरूवात केली जाईल, असे आयुक्त बांगर यांनी जाहीर केले.

केंद्र शासनाच्या धोरणानुसार देशाच्या विविध भागात प्रादेशिक विज्ञान केंद्र निर्माण करणे आवश्यक आहे. त्यानुसार ठाण्यात विज्ञान केंद्र उभारण्याकरिता डॉ अनिल काकोडकर यांचे मार्गदर्शन घ्यावे अशी सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त बांगर यांना केली होती. त्यानुसार ही बैठक झाली. या बैठकीस मराठी विज्ञान परिषदेच्या ठाणे विभागाचे प्रा. ना. द मांडगे हे देखील उपस्थित होते. ठाण्यामध्ये प्रादेशिक विज्ञान केंद्राची उभारणी बाळकुम विभागातील महापालिकेस उपलब्ध झालेल्या सुविधा भूखंडावर होणार आहे. यामध्ये ५ हजार चौ. मी जागेत प्रत्यक्ष प्रकल्पाचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेचे मार्गदर्शन घेण्याची सूचना डॉ. अनिल काकोडकर यांनी बैठकीत केली. तसेच यासाठी आवश्यक असलेले सर्वतोपरी सहकार्य व मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या विज्ञान केंद्रात मुलभूत विज्ञान, भारतीय विज्ञान, कृषी जैविक शास्त्र, अवकाश विज्ञान, उर्जा आणि पर्यावरण, माहिती विज्ञान, विज्ञान शोधिका, तारामंडळ, विज्ञानवाटिका अशा सुविधा तसेच गोलाकार त्रिमिती चित्रपट संकुल, चित्रपट गृहसंकुल, नाविन्यपूर्ण हब, नोबेल म्युझिअम, कॉन्फरन्स सुविधा, शैक्षणिक इमारत, होस्टेल इमारत व फिरते विज्ञान प्रदर्शन अशा सुविधा असाव्यात, अशी सुचनाही त्यांनी केली. ठाणे शहराचे ठिकाण हे शहर व ग्रामीण भागाच्या अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. एका बाजूला संपूर्ण विकसित एमएमआर क्षेत्र तर दुसऱ्या भागात ग्रामीण तसेच आदिवासी पट्टा. या दोन्ही क्षेत्रातील नागरिक आणि शालेय विदयार्थी यांना विज्ञान केंद्राचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेता येईल असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Demand money from company owner in name of MLA Pune news
आमदाराच्या नावाने कंपनी मालकाकडे पैशांची मागणी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
During the speech of Devendra Fadnavis the chairs started emptying nashik news
देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणावेळी खुर्च्या रिकाम्या होण्यास सुरुवात
job opportunities direct recruitment in directorate of medical education
नोकरीची संधी : वैद्याकीय शिक्षण संचालनालयात सरळसेवेने भरती
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त

हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्यातील अनधिकृत शाळा सुरूच, जि. प. शिक्षण विभागाकडून कारवाईच्या फक्त नोटिसा

सर्व घटकांचा समावेश करुन विज्ञान केंद्र उभारणीबाबतचा आराखडा तयार करुन तसा प्रस्ताव सादर करण्यात येईल. राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद आणि ठाण्यात कार्यरत असलेल्या मराठी विज्ञान परिषद यांच्या सहकार्याने प्रस्ताव तयार करण्यात येईल. हा प्रस्ताव शासनास सादर करून मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली कालबद्ध पध्दतीने हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल. या विज्ञान केंद्राचा फायदा ठाणे शहराबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्हयातील शालेय विद्यार्थ्यांना होईल, असे आयुक्त बांगर यांनी यावेळी सांगितले. या विज्ञान केंद्राचे परिचलन महापालिकेमार्फत होणार असून परिचलन खर्चाच्या दृष्टीने हे केंद्र स्वयंपूर्ण कसे बनेल याकडे विशेष लक्ष देण्याबाबतही बैठकीदरम्यान चर्चा झाली.