ठाणे : पत्नीला पहिल्या पतीपासून साडेचार वर्षीय मुलगा त्या मुलाला घरी राहण्यासाठी आणल्याने मोहम्मद दिलशाद मोहम्मद इम्रान (२३) याने त्याला मारहाण केली. तसेच लोखंडी खाटेवर ढकलले. या घटनेत त्याच्या मणक्याचे अस्थिभंग झाल्याने तसेच अंतर्गत जखमा झाल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी मोहम्मद याच्याविरोधात चितळसर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> Dombivli Woman Duped : डोंबिवली एमआयडीसीतील महिलेची उल्हासनगरच्या पती, पत्नीकडून फसवणूक

घोडबंदर येथील चितळसर मानपाडा भागातील एमएमआरडीएच्या रेंटल इमारतीमध्ये मोहम्मद हा महिलेसोबत राहात होता. महिलेला पहिल्या पतीपासून आर्यन नावाचा साडे चारवर्षांचा मुलगा होता. याबाबत मोहम्मद याला माहिती नव्हते. काही महिन्यांपूर्वी महिलेने आर्यनला तिच्यासोबत राहण्यासाठी आणले होते. त्यामुळे मोहम्मद हा नेहमी त्याचा छळ करत असे. २८ जुलैला महिला कामानिमित्ताने बाहेर गेली होती. सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास मोहम्मद याने आर्यनला मारहाण करण्यास सुरूवात केली. त्याला लोखंडी खाटेच्या दिशेने ढकलले. त्यामुळे त्याच्या पाठीच्या मणक्याचा अस्थिभंग झाला. तसेच मोहम्मद याने त्याच्या पोटावर देखील मारहाण केली. त्याच्या यकृत आणि किडनीमधील रक्त साकळल्याने त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिसांना वैद्यकीय अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर ही हत्या असल्याचे समोर आले. त्यानंतर मंगळवारी याप्रकरणी चितळसर पोलिसांनी मोहम्मद याची चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबूली दिली. आर्यनला सोबत राहण्यासाठी आणल्याने त्याने हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane crime four and a half year old boy killed after brutally attacked by stepfather zws