पश्चिमेतील राजूनगर येथील छाया सोसाटीत राहणाऱ्या ४७ वर्षीय गृहस्थांची फसवणूक करून त्यांच्याकडचे आठ लाख ३० हजार रूपये लुबाडल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सीमा फर्नाडिस, रोनाल्डो फर्नाडिस, मेलबन फर्नाडिस, मलीन फर्नाडिस या चार जणांविरोधात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे चारही जण राजूनगर मधीलच श्यामकुंज सोसायटीत राहणारे होते. त्यांनी प्रॉपर्टीमध्ये फ्लॅट घेऊन देतो, पैसे दुप्पट करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करीत त्यांच्याकडून ५ लाख २० हजार रूपयांची रक्कम लुबाडली. त्यानंतर लग्नाला जायचे आहे असे सांगून त्यांनी ३ लाखाचे सोन्याचे दागिने घेतले. दागिने गहाण ठेवून त्याचे व्याजही स्वतच वापरले. तसेच त्यांनतर त्यांनी १० हजाराची मोटार सायकल मुलीला शिकण्यासाठी हवी असे सांगून घेतली. अशाप्रकारे गेल्या चार वर्षांत ८ लाख ३० हजार रूपयांची फसवणूक केली.  याप्रकरणी चौघांविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बॅग हिसकावून २ लाखाच्या रकमेची चोरी
कल्याण – बॅंकेत पैसे भरण्यासाठी गेले असता रस्त्यातच चोरांनी २८ वर्षीय इसमाच्या हातून बॅग हिसकावून चोरल्याची घटना मंगळवारी घडली. पश्चिमेतील जोकर टॉकीज मागील देवी कृपा सोसायटीत राहणारा २८ वर्षीय इसम १६ जून रोजी दुपारी ११ च्या सुमारास झुंझारराव मार्के ट गल्ली रोडयेथील आर.बी. ज्वेलर्स येथून जात असताना त्यांना पाठीमागून कोणीतरी धक्का मारला. त्यासरशी त्याने मागे वळून पाहिले असता त्यांच्या हातातील बॅग चोरटय़ांनी खेचली. या बॅगमध्ये २ लाख रुपयांची रोख रक्कम होती. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइलची चोरी
ठाणे – पश्चिमेतील जी.बी.रोड येथील गौरीकुंज सोसायटीत राहणाऱ्या ३१ वर्षीय महिला मंगळवारी मुलाला शाळेत सोडून घरी जात असताना त्यांच्या हातातील मोबाईन चोरटय़ांनी चोरल्याची घटना घडली. त्रिमुर्ती शाळेजवळ मुलाला शाळेत सोडून फिर्यादी या फोनवर बोलत शाळेच्या बाहेर उभ्या होत्या. यावेळी मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी त्यांच्या हातातील १३ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर परिसरातील अनुराधा कोरस नक्षत्र येथे राहणारे ४९ वर्षीय इसम मंगळवारी मुलूंड येथे जाण्यास निघाले होते. सकाळी अकराच्या सुमारास  कोरस नक्षत्र बसस्टॉप ते रुणवाल प्लाझाच्या दरम्यान बसमध्ये त्यांच्या जवळील २० हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरटय़ाने चोरला याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ
ठाणे – वर्तकनगर येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या ३९ वर्षीय गृहस्थांनी १० जून रोजी रात्री पश्चिमेतील सिद्धेश्वर तलावाजवळील सव्‍‌र्हिस रोडवरील शंकर मंदिराजवळ त्यांची ५० हजार रुपये किमतीची मोटार सायकल पार्क केली होती. रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरटय़ाने त्यांची मोटार सायकल चोरली. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच पश्चिमेतील लोकमान्य नगर येथील लक्ष्मी फेज मध्ये राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने त्याच्या घराजवळ मोटार सायकल पार्क  केली होती. ६ ते १४ जून या कालावधीत अज्ञात चोरटय़ाने ती चोरली. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० हजाराच्या मोबाइलची चोरी
डोंबिवली – पूर्वेतील कल्याण शीळ रोडवरील काटई गावात राहणाऱ्या ३४ वर्षीय गृहस्थांच्या दुकानात २० हजार रुपये किमतीच्या मोबाईलची चोरी झाल्याचा प्रकार ९ ते १० जूनच्या दरम्यान घडला.
लोढा हेवन येथील ओम एन्टरप्राईजेस दुकानातील २० हजार रुपये किमतीचे मोबाईल अज्ञात चोरटय़ाने चोरले. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.