कल्याणमध्ये रिक्षाचालकांची मुजोरी वाढत असून, एका मुजोर रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याला अन्य रिक्षाचालकांनी धक्काबुक्की केली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कल्याण, डोंबिवली परिसरात रिक्षाचालकांविरोधात तक्रारी आल्याने वाहतूक पोलिसांनी वेगवेगळ्या रिक्षा थांब्यावर विशेष गस्त ठेवली आहे. कल्याण वाहतूक शाखेत कार्यरत असणारे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख (५०) यांच्याकडे भाडे नाकारणाऱ्या एका रिक्षाचालकाची तक्रार आली. त्यानुसार संबंधित चालकाविरोधात कारवाई करण्यासाठी ते गेले. कारवाई करीत असताना सात ते आठ रिक्षाचालक घटनास्थळी आले. या रिक्षाचालकांनी गोंधळ घालून पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणला, तसेच देशमुख यांचे दोन्ही हात धरूनत्या रिक्षाचालकास पळून जाण्यासाठी मदत केली.
या प्रकरणी याकूब वाहीद कुरेशी याच्यासह सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा