ठाणे : ठाण्यातील वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका कार्यालयात काही तरुण तलवारी, कोयते हातात घेऊन तेथील व्यक्तींना मारहाण करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचे सीसीटीव्ही संपूर्ण ठाण्यात समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ही घटना वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. त्यानुसार वर्तक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे. या व्हिडिओमध्ये पाच ते सहा जण एका कार्यालयामध्ये शिरताना दिसत आहे त्या कार्यालयामध्ये सात ते आठ संगणक होते. दोन तरुण त्या कार्यालयामध्ये असताना हातामध्ये कोयते, तलवारे घेऊन तरुण शिरले आणि त्यांनी त्या कर्मचाऱ्यांना मारहाण सुरू केली.
त्यानंतर त्या तरुणांनी कार्यालयातील संगणकांची नासधूस केली. एक व्यक्ती आल्यानंतर हे सर्व हल्लेखोर तेथून निघून गेले. या घटनेचे चित्रीकरण कार्यालयातील सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे. त्या हल्लेखोरांनी जाताना सीसीटीव्ही कॅमेरा देखील फोडला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण शहरात समाज माध्यमाद्वारे प्रसारित झाल्यानंतर एकच खळबळ उडाली.
ठाणे: वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका कार्यालयात काही तरुण तलवारी, कोयते हातात घेऊन तेथील व्यक्तींना मारहाण करत असल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणाचे सीसीटीव्ही संपूर्ण ठाण्यात समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. pic.twitter.com/QKgji1B09u
— LoksattaLive (@LoksattaLive) February 28, 2025
वागळे इस्टेट, श्रीनगर आणि वर्तक नगर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु झाल्या नंतर हे प्रकरण वर्तक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे त्यानुसार वर्तक नगर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हल्ले करतो चाकी न्यायालय असावे असा अंदाज पोलिसांना आहे. पूर्व वैमन्यासातून हा हल्ला झाला असावा असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.