लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे – जिल्ह्यात सद्यस्थितीत मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून त्यात पदवीधर निवडणुकांची देखील नोंदणी सुरु आहे. यामध्ये युवकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने युवामहोत्सवाच्या ठिकाणी नव मतदारांच्या नोंदणीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकाच छताखाली युवकांना मतदार नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पार पडता येणार आहे.

Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
martyred soldier shubham ghadge cremated news in marathi
सातारा : शहीद शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी
Decision to increase maximum age limit by one year for recruitment to various posts of MPSC
‘एमपीएससी’ : ‘या’ परीक्षांसाठी नव्याने अर्जाची संधी, परीक्षेच्या तारखेतही बदल…
Thane Lake, Thane Lake wetland Survey,
तलावांच्या ठाण्यात चारच पाणथळांचे सर्वेक्षण, ठाणे शहरातील चार ठिकाणांची पाणथळ क्षेत्रात नोंद
Registration for CET exam admissions begin next week
सीईटीची नोंदणी प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार
Sadhu Vaswani Flyover, pune Municipal Corporation Decision, Pune Station Area, Sadhu Vaswani Flyover pune , pune,
पुणे स्टेशन परिसरातील साधू वासवानी उड्डाणपुलाबाबत महानगरपालिकेचे ठरलं !

क्रीडा व युवक सेवा संचालनालय नेहरु युवा केंद्र व कृषी आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यात युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक स्तरावर विजयी होणाऱ्या युवक युवतींना राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्याची संधी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे युवा महोत्सवासाठी महाराष्ट्रात तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. सर्व शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी संबंधित प्राचार्यांनी प्रयत्न करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी बैठकीत दिले आहेत.

आणखी वाचा-डोंबिवली एमआयडीसीत धुळीचे लोट

महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी विशेष स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात. या युवा महोत्सवाच्या निमित्ताने १७ ते २१ या वयोगटातील जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करुन घेण्यासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. वयोगट व सहभाग पात्रता – या युवा महोत्सव स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी १५ ते २९ वर्षे वयोगट राहील. तसेच जिल्ह्यातील कृषी महाविद्यालये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, महिला मंडळ तसेच १५ ते २९ वर्ष वयोगटातील युवांना या युवा महोत्सवामध्ये सहभागासाठी पात्रता राहील. ठाणे जिल्ह्यातील युवा महोत्सवाचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत मतदार याद्यांचे पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. तसेच पदवीधर निवडणुकांची देखील नोंदणी सुरु आहे. परंतु यामध्ये युवकांचा कमी प्रतिसाद लाभला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने युवामहोत्सवाच्या ठिकाणी नव मतदारांच्या नोंदणीचा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकाच छताखाली युवकांना मतदार नोंदणीच्या सर्व प्रक्रिया पार पडता येणार आहे. तसेच या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील. अधिक माहितीकरिता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाने आवाहन केले आहे.

Story img Loader