ठाणे : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने येत्या ९ नोव्हेंबरला चक्रीवादळ आपत्ती निवारणाविषयी कोकण किनारपट्टीमधील जिल्ह्यांमध्ये रंगीत तालीम होणार आहे. या राज्यस्तरीय उपक्रमात ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गावाचा समावेश आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल याबाबतची ही रंगीत तालीम असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चक्रीवादळ आपत्ती निवारणविषयी होणाऱ्या रंगीत तालिमीच्या अनुषंगाने बुधवारी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे एक बैठक पार पडली. यावेळी स्थानिक जिल्हा प्रशासनाला या उपक्रमाची माहिती देण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या प्रकारे मदत कार्य करता येईल, आपदग्रस्तांना वाचविण्यासाठी काय तयारी केली जाणार आहे, आपदग्रस्तांची कशा प्रकारे सुटका करणार आहे, आपत्तीच्या अनुषंगाने करण्यात येणारे उपाय योजना, साधनसामुग्री उपलब्धता, मनुष्यबळ, किनाऱ्यावरील नागरिकांचे स्थलांतरण, रुग्णवाहिका, आरोग्य सेवा, निवारा केंद्रे उभारणी या बाबतची रंगीत तालीम या वेळी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृहांमधील दुर्गंधीने प्रवासी हैराण

ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील मोठागाव-ठाकुर्ली, अंबरनाथ एमआयडीसी व भिवंडी तालुक्यातील पडघा गावाचा समावेश आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. या उपक्रमासंदर्भात पार पडलेल्या बैठकीला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अनिता जवंजाळ, तहसिलदार संजय भोसले, अंबरनाथच्या तहसिलदार प्रशांती माने यांच्यासह जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिकांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, अग्निशमन अधिकारी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे नोडल अधिकारी उपस्थित होते.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane district disaster management authority will give training on 9th november about how to save people during cyclone css