३ लाख ५४ हजार नवीन मतदारांची नोंदणी

यंदाच्या मतदार दिनाचे घोषवाक्य ‘नो व्होटर्स, टू बी लेफ्ट बिहाइंड’ असे असून जास्तीत जास्त मतदारांनी नोंदणी करून मतदान करावे असा उद्देश आहे. ठाणे जिह्यात ३ लाख ५४ हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आली असून नवीन मतदारांच्या नोंदणीत ठाणे जिल्हा राज्यात प्रथम आहे, अशी माहिती ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी गडकरी रंगायतन येथील कार्यक्रमात दिली.

Chief Minister Fadnavis instructs to provide various services without delay District Good Governance Index Report released
विविध सेवा विनाविलंब उपलब्ध करा; मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना; जिल्हा सुशासन निर्देशांक अहवालाचे प्रकाशन
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
BJP Ghar Chalo , Ghar Chalo, BJP target members booth ,
पुणे : भाजपचे ५ जानेवारीला ‘घर चलो’, प्रत्येक बूथवर २०० सदस्यनोंदणीचे उद्दिष्ट
Maharashtra Public Holiday 2025 List in Marathi
Maharashtra Holiday List 2025 : सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्ट्यांची यादी जाहीर! २४ सार्वजनिक सुट्ट्यांसह मिळेल ‘ही’ एक्स्ट्रा सुट्टी
inspection of TMT drivers List of instructions for drivers thane news
टीएमटी चालकांची सकाळ संध्याकाळ तपासणी;  चालकांसाठी सुचनांची यादी

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय निवडणूक विभागातर्फे शुक्रवारी राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे जिल्ह्य़ातील नवमतदारांनी मतदान करण्याची शपथ घेतली, प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या कलाकारांनी स्वतवरील मतदानाविषयी निरुत्साही असण्याचा शिक्का पुसून काढत मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

मतदान करणार नसाल तर व्यवस्थेवर बोलण्याचा हक्क नाही, असे अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले. मीडिया सल्लागार एजन्सी क्रिएफीनीटीचे यश देशपांडे यांनीदेखील तरुणांशी संवाद साधला. याप्रसंगी सर्व उपस्थित कलाकारांना निवडणूक विभागातर्फे व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखविले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी आरोलकर यांनी प्रास्ताविक सादर केले. बांदोडकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाटय़ सादर केले. कार्यक्रमाला अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी अमोल खंडारे, उपजिल्हाधिकारी जलसिंग वळवी, उपेंद्र तामोरे, ठाणे तहसीलदार अधिक पाटील, तहसीलदार विकास पाटील, राज तवटे उपस्थित होते.

नव मतदार आणि विजेत्यांचा सत्कार

मतदानाविषयी निबंध, वक्तृत्व, रांगोळी अशा विविध स्पर्धातून जनजागृती करण्यात आली होती. या स्पर्धातील विजेत्यांना शुक्रवारी पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तर शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील नवोदित मतदार, अपंग मतदार यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मतदार नोंदणीत उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही गौरविण्यात आले.

कल्याण ग्रामीण, मुरबाडमध्ये सर्वाधिक

सर्वाधिक ४० हजार २२९ एवढी नोंदणी कल्याण ग्रामीणमध्ये, त्यापाठोपाठ ३७ हजार १६७ एवढी नोंदणी मुरबाडमध्ये झाली. ऐरोलीत २० हजार १६२, मुंब्रा कळव्या १८ हजार ५९७, मीरा भाईंदर २२ हजार ७१४, भिवंडी ग्रामीण १८ हजार ६९५, शहापूर १३ हजार २०१, भिवंडी पश्चिम १९ हजार ४११, भिवंडी पूर्व १४ हजार ९५०, कल्याण पश्चिम ३३ हजार ९६७, अंबरनाथ १७ हजार १३२, उल्हासनगर १० हजार १३०, कल्याण पूर्व १७ हजार १९९, डोंबिवली १० हजार ७०३, ओवळा माजिवडा २१ हजार ३०३, कोपरी ७ हजार ७६३ एवढी नोंदणी झाली.

Story img Loader