ठाणे जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व समसमान पध्दतीने अबाधित ठेवायचे असेल तर आपल्या विश्वासातील अधिकारी व्यक्तिीच ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री म्हणून नेमावा लागेल. हा दूरदृष्टीचा विचार करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील डोंबिवलीचे आमदार कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

ठाण्याबरोबर रायगड, पालघऱ् जिल्ह्यातील राजकीय व इतर परिस्थितीचा मंत्री रवींद्र चव्हाण यांना गेल्या पाच वर्षात चांगलाच अभ्यास झाला असल्याने प्रसंगी ते ठाणे जिल्ह्या बरोबर रायगड, पालघरमध्येही निवडणूक व इतर राजकीय पेचप्रसंग उद्भवल्यास तेथे महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात हा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असल्याचे विश्वसनीय सुत्रांकडून समजते.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

येत्या काळात ठाणे, पालघर जिल्ह्यांवरील आपले वर्चस्व भरभक्कम करुन ते अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून समन्वयाने नवी मुंबईची जबाबदारी गणेश नाईक, मिरा-भाईंदर प्रताप सरनाईक, ठाण्यात स्वता मुख्यमंत्री, चिरंजिव खा. डॉ. शिंदे, डोंबिवलीत रवींद्र चव्हाण, मुरबाड, बदलापूर, अंबरनाथ पट्टा किसन कथोरे आणि भिवंडी कपील पाटील यांचे नेतृत्व कायम ठेवतील. या नेत्यांच्या जोरावर स्थानिक पालिका, पालिका अंतर्गत स्थायी समिती सभापती व इतर प्रभाग निवडणुका ताकदीने लढवून पालिकांवरील आपले वर्चस्व कायम ठेवतील, अशी व्यूहरचना शिंदे-फडणवीस यांनी आखली आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री अनुभव, वयाने ज्येष्ठ असलेल्या गणेश नाईक, किसन कथोरे यांना दिले तर प्रत्येक वेळी त्यांना आदेश देणे, त्यांच्याकडून काम करुन घेणे त्यांच्या ज्येष्ठतेचा विचार करुन मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांना शक्य नाही. त्यामुळे आपला समवयस्क, शब्दाच्या अधीन राहणाऱ्या रवींद्र चव्हाण यांची ठाणे जिल्हा पालकमंत्री पदी वर्णी लावण्याची आखणी करण्यात आली आहे, असे विश्वसनीय सुत्राने सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील येत्या काळातील विकास प्रकल्प, त्यासाठी येणारा निधीचे योग्य नियोजन आणि त्यावरील नियंत्रणासाठी शब्द पाळणारा माणूस हाताशी पाहिजे, हाही विचार चव्हाण यांच्या निवडी मागे असल्याचे समजते.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दबदबा मोडीत काढून आपले वर्चस्व जिल्ह्यात अबाधित ठेवायचे आणि आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना तुल्यबळ लढत द्यायची असे नियोजन पालकमंत्री पद चव्हाण यांच्याकडे देण्या मागे असल्याचे कळते.

खांद्यावर हात –

समोरचा मित्र, विरोधक अन्य कोणीही असला तरी परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याच्या खांद्यावर हात टाकून विषय भिजत न ठेवता तेथल्या तेथेच मिटून टाकणे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राजकीय कामाची पध्दत आहे. त्यांच्या या कामाच्या पध्दतीमुळे ते अजातशत्रू म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीचे नेते दिवंगत वसंत डावखरे यांचीही हीच कामाची पध्दती होती. याच कार्यपध्दतीने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य कारभार करण्यास सुरूवात केली आहे. शिवसेनेतील कोणीही पदाधिकारी शिंदे गटात सामील होण्यासाठी आल्या नंतर त्याला ‘तू एवढे दिवस कोठे होतास’ म्हणून जाब न विचारता त्याच्याशी दोन गोष्टी बोलून खांद्यावर हात टाकून मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांना आपलेसे करत आहेत.

मंगळवारी राजभवनावरील शपथविधीच्या वेळी शपथ घेणाऱ्या प्रत्येक कॅबिनेट मंत्र्याशी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हस्तालोंदन करत होते. रवींद्र चव्हाण यांनी शपथ घेऊन हस्तालोंदनासाठी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर जाताच, शिंदे यांनी फक्त मंत्री चव्हाण यांच्या खांद्यावर हात टाकून त्यांना आपलेपणाची ग्वाही दिली. हे दृश्य अनेकांच्या नजरांनी अचूक टीपले.

ज्या जबाबदारी देण्यात येतील त्या आपण निष्ठेने पार पाडू –

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपणास ज्या जबाबदारी देण्यात येतील त्या आपण निष्ठेने पार पाडू. पालकमंत्री पदा संदर्भात मला काही माहिती नाही.” असं कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण

Story img Loader