ठाणे : कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे पदवीधर निवडणुकीत कोकण विभागातील पाच जिल्ह्यांपैकी ठाणे आणि रायगड जिल्ह्याचे राजकीय दृष्ट्या महत्व वाढले आहे. या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील शिक्षक आणि पदवीधर अशा चार मतदार संघाच्या निवडणुका जाहिर झाल्या आहेत. यामध्ये कोकण पदवीधर मतदार संघाचाही समावेश आहे. या निवडणुकीसाठी २६ जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण २५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे संजय मोरे, मनसेचे अभिजीत पानसे तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अमित सरैय्या, उबाठाचे किशोर जैन यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे रमेश कीर आणि भाजपचे निरंजन डावखरे या दोन्ही उमेदवारांमध्ये लढत होणार असून याठिकाणी महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहाव्यास मिळणार आहे.
आणखी वाचा-ठाणे : रेल्वे प्रवाशांकडून दिव्यांगास मारहाण, दिव्यांग असल्याची विचारणा केल्याने मारहाण
कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम करण्यात आलेल्या यादीत २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत. त्यात, ठाणे जिल्ह्यातील ९८ हजार ९३, रायगड जिल्ह्यातील ५४ हजार ९३१, सिंधुदूर्ग जिल्ह्यातील १८ हजार ५५१, पालघर जिल्ह्यातील २८ हजार ३३३ आणि रत्नागिरी जिल्ह्यातील २२ हजार ६८६ मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजेच ९८ हजार ९३ इतके मतदार असून त्याखालोखाल रायगड जिल्ह्यात ५४ हजार ९३१ मतदार आहेत. यामुळे निवडणुकीच्या दृष्टीकोनातून राजकीय महत्व वाढलेल्या या दोन्ही जिल्ह्यावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे.
मतदारांची आकडेवारी
कोकण विभाग पदवीधर मतदार संघात पालघर जिल्हा स्त्री १२ हजार ९८७, पुरुष १५ हजार ९३० तर, तृतियपंथी ८, ठाणे जिल्हा स्त्री ४२ हजार ४७८, पुरुष ५६ हजार ३७१ तर, तृतियपंथी ११, रायगड जिल्हा स्त्री २३ हजार ३५६, पुरुष ३० हजार ८४३ तर तृतियपंथी ९, रत्नागिरी जिल्हा स्त्री ९ हजार २२८, पुरुष १३ हजार ४५३ तर, तृतियपंथी ०, सिंधुदुर्ग जिल्हा स्त्री ७ हजार ४९८, पुरुष ११ हजार ५३ तर, तृतियपंथी ०, असे एकूण २ लाख २३ हजार २२५ इतके मतदार आहेत.
आणखी वाचा-कल्याणमध्ये मजुराने स्वत:वर चाकूने वार करून जीवन संपविले
१३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
काँग्रेस पक्षाचे रमेश कीर, भाजपचे निरंजन डावखरे, भीमसेना विश्वजित तुळशीराम खंडारे, अपक्ष अमोल अनंत पवार, अरुण भिकण भोई, अक्षय महेश म्हात्रे, गोकुळ रामजी पाटील, जयपाल परशूराम पाटील, नागेश किसनराव निमकर, प्रकाश वड्डेपेल्ली, मिलिंद सिताराम पाटील, ॲड. शैलेश अशोक वाघमारे, श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, असे १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.