ठाणे : जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघात अजित पवार गटाचे दौलत दरोडा अवघ्या १ हजार ७२ मतांनी विजय झाले. दरोडा यांच्याविषयी नाराजी असल्याची चर्चा मतदारसंघात होती. परंतु जिजाऊ संघटनेच्या उमेदवार रंजना उघडा यांना मिळालेली ४२ हजार मते आणि प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात नाराजी दूर करण्यात मिळालेले यश यामुळे दरोडांचा हा विजय झाल्याची चर्चा आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघ हा आदिवासी आणि कुणबी बहुल भाग आहे. मतदारसंघात २००९ पासून कोणत्याही उमेदवार सलग दोन वेळा निवडून आलेला नव्हता. २००९ मधील विधानसभेत दौलत दरोडा हे शिवसेनेत असताना निवडून आले होते. तर २०१४ मध्ये राष्ट्रवादीत असताना पांडुरंग बरोरा यांना निवडून देण्यात आले होते. २०१९ मध्ये बरोरा यांनी अचानक शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उमेदवारीचे दोर कापले जाण्याची शक्यता असल्याने दरोडा यांनी राष्ट्रवावादीमध्ये प्रवेश केल्याची चर्चा होती. त्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळाली. त्यामुळे पांडुरंग बरोरा आणि दौलत दरोडा यांच्यामध्ये लढत झाली. २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा दौलत दरोडा हे राष्ट्रवादीतून निवडून आले होते. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दरोडा हे अजित पवार यांच्यासोबत गेले. तर बरोरा यांनी शिवसेनेतून शरद पवार गटात प्रवेश केला. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील कुणबी मतदार मोठ्याप्रमाणात जिजाऊ या संघटनेच्या पाठीशी असल्याचे दिसून आले. या विधानसभा निवडणुकीत अजित पवार गटाचे दौलत दरोडा, शरद पवार गटाचे पांडुरंग बरोरा आणि जिजाऊ संघटनेच्या रंजना उघडा या तिघांमध्ये लढत होती. या मतदारसंघात दरोडा यांना ७३ हजार ८१, बरोरा यांना ७१ हजार ४०९ तर रंजना उघडा यांना ४२ हजार ७७६ इतकी मते मिळाली. दरोडा हे अवघ्या १ हजार ६७२ मतांनी निवडून आले. कुणबी मतदारांनी रंजना उघडा यांना मोठ्याप्रमाणात मतदान केल्याची चर्चा आहे. तसेच दरोडा यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात घटक पक्षामधील नाराजी दूर केल्याने त्यांना हा विजय मिळविणे शक्य झाल्याचे बोलले जात आहे.
शहापूर येथील मतदारसंघात रमा आरज या पिपाणी या चिन्हावर निवडणूक लढवित होत्या. त्यांना ३ हजार ८९२ इतकी मते मिळाली. त्यामुळे या चिन्हाचा देखील बरोरा यांना फटका बसल्याची चर्चा आहे.