ठाणे : ठाणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून जलवाहीनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे ठाणे शहरातील काही भागांसह दिवा, कळवा, मुंब्रा भागाचा पाणीपुरवठा आज, शुकवारी चोवीस तास बंद राहणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५८५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यापैकी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. या पाण्याचा पुरवठा मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा आणि वागळे इस्टेटमधील काही भागात केला जातो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत बारवी गुरूत्व वाहिनीचे कटाई नाका ते शीळ टाकी येथे तातडीचे दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे महामंडळाकडून ठाणे महापालिका क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा आज शुकवार, २० सप्टेंबर रोजी चोवीस तासांसाठी बंद राहणार आहे. या बंदमुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा, कळवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननर नं. २, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समितीमधील कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील. या बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे या भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

st logo st bus
चाळिशी पार केलेल्या ‘एसटी’ कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
nandgaon in nar par damanganga river linking project marathi news
नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही
ratnagiri st buses of ganesha devotees stopped for toll
कोकणात जाणाऱ्या एसटी टोलसाठी रोखल्याने आनेवाडीजवळ तणाव
ganpati mandaps erected on roads,
नाशिक : रस्त्यांवरील मंडपांमुळे वाहतुकीला अडथळा
Roads Alibaug, MMRDA, Alibaug tourists,
अलिबागमधील दहा गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचा विकास होणार, एमएमआरडीए ३२५ कोटी रुपये खर्च करणार, पर्यटकांना दिलासा
Ambad project affected people adamant on agitation half-naked march till Loni
अंबड प्रकल्पग्रस्त आंदोलनावर ठाम, लोणीपर्यंत अर्धनग्न मोर्चा
tap water Water cut off in some parts of Thane on Wednesday x
ठाण्याच्या काही भागात बुधवारी पाणी नाही; पाणी नियोजनामुळे २४ ऐवजी १२ तासांचे पाणी बंद