ठाणे : राज्यात वायूप्रदूषणामुळे एकीकडे खासगी विकासकांच्या बांधकामांना प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली आखून दिली जात असताना दुसरीकडे सरकारी प्रकल्पांच्या कामांमुळे शहरात धुळधाण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. ठाणे शहरातील मेट्रो, घोडबंदर सेवा आणि मुख्य रस्ते जोडणी आणि मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. या कामांमुळे मोठ्याप्रमाणात धुळीचे साम्राज्य निर्माण होते. या धुळीवर नियंत्रण राहावे यासाठी पुरेशी उपाययोजना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) केली जात नसून यामुळे नियमांची अंमलबजावणी सरकारी यंत्रणांकडूनच पाळली जात नसल्याचे चित्र आहे.

ठाणे जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यातील सर्वांत महत्त्वाचे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. तसेच घोडबंदर भागात लोकवस्ती वाढली असून वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना सहन करावी लागते. त्यामुळे मुख्य रस्ता आणि सेवा रस्त्याचे एकत्रिकरण करण्याचा प्रकल्प देखील हाती घेण्यात आला आहे. या दोन्ही प्रकल्पांचे काम ‘एमएमआरडीए’कडून सुरू आहे. तर, मुंबई नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम ‘एमएसआरडीसी’कडून केले जात आहे. परंतु या कामाचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागत आहे. हिवाळ्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे धुळीकण हवेच्या खालील स्तरावर तंरगतात. वायू प्रदूषणास महत्त्वाचे कारण हे धुळीकण ठरत असतात. मुंबई नाशिक महामार्ग आणि घोडबंदर भागात विविध प्रकल्पांच्या कामामुळे ठिकठिकाणी धुळीकण निर्माण होऊन ते नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू लागले आहे. धुळीकण डोळ्यात आणि फुफ्फुसात जात आहे.

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
MahaRERA action against 905 housing projects Mumbai news
१,९०५ गृहप्रकल्पांवर ‘महारेरा’ची कारवाई; नोटिशीला प्रतिसाद न देणाऱ्या विकासकांची बॅँक खाती गोठवली
Efforts underway to reduce human-wildlife conflict says Vivek Khandekar
मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू – खांडेकर
pune municipal corporation will take action against banners
पिंपरी : फलकांद्वारे शहर विद्रूप केल्यास आता दंडात्मक कारवाई, महापालिका आयुक्तांचा आदेश; प्रभागनिहाय नागरिकांची समिती
Why is desulfurization mandatory to reduce air pollution in thermal power plants and how much will it increase electricity prices
विश्लेषण: ‘डीसल्फरायझेशन’ हवे की वीज दरवाढ… की प्रदूषण?
Air Quality Byculla , Air Quality Borivali,
बोरिवली व भायखळ्यातील निर्बंध उठले, ‘हे’ भाग निरीक्षणाखाली, वायू प्रदूषणासंदर्भात पालिका आयुक्तांनी दिला इशारा
Health , Mumbai Municipal Corporation ,
प्रदूषण काळात व्यायाम टाळावा, मुंबई महापालिकेचा नागरिकांसाठी आरोग्य सल्ला

हेही वाचा – ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम

घोडबंदर भागात मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू असून अनेक भागात मातीचे ढिगारे रचण्यात आले आहे. या मातीच्या ढिगाऱ्यांवर कोणतेही अच्छादन दिसून येत नाही. तर सेवा रस्ता आणि मुख्य रस्ता एकत्रिकरणाची कामे सुरू आहेत. त्यासाठी घोडबंदर भागात सेवा रस्ते विविध ठिकाणी खोदले आहेत. येथील मातीचे ढिगारे देखील तसेच असल्याचे चित्र आहे. घोडबंदर भागात शाळा, महाविद्यालये आहेत. शाळकरी मुलांना सकाळ आणि दुपारच्या वेळेत धुळीकणांचा त्रास सहन करावा लागतो. नाशिक महामार्गावरही अनेक ठिकाणी मुख्य मार्गाचे काम सुरू आहे. या भागातही रस्त्याकडेला मातीचे ढिगारे तयार झाले असून रस्त्याची धुळधाण झाली आहे. या संदर्भात एमएमआरडीए प्रशासनाशी संपर्क साधूनही त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

रस्त्याकडेला मातीचे ढिगारे असल्यास त्या ढिगाऱ्यांतून धुळीकण निर्माण होतात. हे धुळीकण डोळ्यात आणि फुफ्फुसामध्ये शिरतात. फुफ्फुसामध्ये धुळीकण गेल्यास ते बाहेर निघण्याचा मार्ग नसतो. त्यामुळे हे धुळीकण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरते. – मोहसिन खान-पठाण, वातावरण संस्था.

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ला येथे जल्लोष

मुंबई नाशिक महामार्गाच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण आणि डांबरीकरण झाले आहे. त्यामुळे धुळीचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच कामाच्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असेल तर तेथील कंत्राटदारांना सूचना देण्यात येईल. – रमेश खिस्ते, अधीक्षक अभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ.

Story img Loader