ठाणे : मुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे. येत्या ५ जूनपासून पाणी कपातीत वाढ होणार असून ही वाढ १० टक्के इतकी असणार आहे. या कपातीमुळे मुंबई महापालिकेच्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार असल्याने येथील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून १२० दशलक्ष लीटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. यामुळे हा जलसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा, यादृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई महानगरपालिकेने पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणी पुरवठातही पाच टक्के कपात लागू झाली आहे. या कपातीमध्ये ५ जूनपासून आणखी वाढ केली जाणार असून ही वाढ १० टक्के इतकी असणार आहे.

पुणे: शहरातील सर्व पाण्याच्या टाक्यांची होणार स्वच्छता, हे आहे कारण !
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
Mumbais Water for All policy provided 7868 new water connections by December 2024
सर्वांसाठी पाणी धोरणाअंतर्गत १५ हजार अर्ज, ७८६८ जोडण्या दिल्या
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
water supply cut in mumbai news
मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद

हेही वाचा…शिळफाटा रस्त्यावरील मेट्रोची दिखाव्याची कामे बंद करा, मनसे आमदार राजू पाटील यांची ‘एमएमआरडीए’वर टीका

या परिसरांना कपातीचा फटका

मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचे वितरण ठाण्यातील विविध भागांमध्ये करण्यात येते. यामध्ये नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नंबर १, किसन नगर नंबर २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, सावरकरनगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नंबर १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या भागांचा समावेश आहे. या भागांमध्ये आता ५ टक्के पाणी कपात लागू झाली आहे. तर, ५ जून पासून येथे १० टक्के पाणी कपात लागू होणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.

Story img Loader