मुंबई आणि नागपूरदरम्यान जलद वाहतुकीसाठी हाती घेण्यात आलेल्या समृद्धी द्रूतगती महामार्गास ठाणे जिल्ह्य़ातून झालेला तीव्र विरोध मोडीत काढून आवश्यक जमिनीपैकी ७० टक्क्य़ांहून अधिक जमीन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने अधिग्रहीत केली आहे, असा दावा जिल्हा प्रशासनाकडून केला जात आहे. या प्रकल्पासाठी इंचभरही जमीन दिली जाणार नाही, अशी भूमिका घेऊ न संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मात्र ती संघर्षांची धार नंतरच्या काळात काहीशी बोथट झाली. फारशा लागवडीखाली नसलेल्या जमिनींना दामदुपटीने मिळत असलेल्या दरामुळे दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी शासनासोबत सौदे केले आहेत. त्यासाठी शासनाने चारशे कोटींहून अधिक रूपयांचा मंोबदला शेतकऱ्यांना दिला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अशाप्रकारे सातबारा शासनाच्या नावे करून जिल्ह्य़ातील हजारो शेतकरी लखपती झाले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा