ठाणे : ठाण्यात कार्यकर्त मेळाव्याचे आयोजन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आले होते. या मेळाव्यापूर्वी आनंद आश्रमाबाहेर शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी दिली. तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. आनंद आश्रमजवळ अशी घटना घडणार असल्याचा अंदाज बांधला जात होता. परंतु पोलीस बंदोबस्त असतानाही या प्रकारमुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गद्दारांकडून स्वागताची अशीच अपेक्षा होती असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला.
विधानसभा निवडणूकीनंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करत आहेत. पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाने राज्यात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याची सुरुवात आज, रविवारपासून ठाण्यात होत आहे. या मेळाव्यास खासदार संजय राऊत यांच्यासह महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित आहेत. ज्या ठाण्यातून शिवसेना फुटली. त्याच ठाण्यातून कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, राजन विचारे, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू उपस्थित होते.
मेळाव्यापूर्वी ठाण्यात दुचाकी रॅली आयोजित करण्यात आले होते. ही रॅली आनंद आश्रमाजवळ आली असताना आनंद आश्रमाबाहेर उभ्या असलेल्या शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली. आनंद आश्रमासमोर पोलीस बंदोबस्त असतानाही दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते. या घटनेमुळे तणावाचे वातावरण पसरले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी आनंद आश्रमाजवळील आनंद दिघे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्व कार्यकर्ते तेथून शक्तीस्थळावर निघून गेले.
अपवित्र लोकांनी पाया पडणे ही वाईट गोष्ट त्यामुळे आम्ही हा भाग धुतला आहे. आमच्या महिला आघाडीने त्यांना उत्तर दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जोरावर शिवसेना होती. शिवसेना कोणाकडे आहे हे लोकांना आता कळलेले आहे.माझी महापौर मिनाक्षी शिंदे