अंधेरीतील आगीनंतर ठाणे अग्निशमन दलाचा निर्णय
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
ठाणे : मुंबईतील कामगार रुग्णालयातील आगीच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर ठाणे अग्निशमन विभागाने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांची अग्निसुरक्षा यंत्रणा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. सहा पथके तयार करण्यात आली असून, सर्वच रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून त्याचा अहवाल डिसेंबर अखेरीस सादर करण्यात येणार आहे. त्रुटी आढळल्यास तात्काळ सुधारणा करून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे आगीच्या घटना रोखणे आणि जीवितहानी टाळणे शक्य होईल, असा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
अंधेरी पूर्व एमआयडीसीतील कामगार रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी मोठी आग लागली. त्यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर १५७ जण जखमी झाले. त्यानंतर मुंबईसह राज्यातील सर्वच रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे अग्निशमन विभागाने शहरातील सर्वच खासगी रुग्णालयांची आरोग्य यंत्रणा तपासण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रकही अग्निशमन विभागाने काढले आहे. ठाणे शहरात अग्निशमन विभागाचे सहा स्थानक अधिकारी असून या सर्वाना २० डिसेंबपर्यंत आपापल्या हद्दीतील रुग्णालयांची यादी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्वच रुग्णालयांची अग्निशमन यंत्रणा तपासून अहवाल ३१ डिसेंबरपूर्वी सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
ठाण्यात ३८४ खासगी रुग्णालये
ठाणे महापालिकेचे कळवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे, तर शहराच्या वेगवेगळ्या भागांत आरोग्य केंद्रे आहेत. राज्य शासनाचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ३८४ खासगी रुग्णालये आहेत. आरोग्य विभागाकडे ३७२ रुग्णालयांची नोंदणी असून उर्वरित रुग्णालये नोंदणीच्या प्रक्रियेत आहेत. या सर्व रुग्णालयांची अग्निशमन विभागाकडून तपासणी केली जाणार आहे.
दरवर्षी जानेवारीत रुग्णालयांची तपासणी करून त्यांना अग्निशमन परवाने देण्यात येतात. मात्र, डिसेंबरमधील सुट्टय़ा लक्षात घेऊन ही प्रक्रिया लवकर सुरू करण्यात आली आहे. सहा पथकांमार्फत यंत्रणा तपासली जाणार आहे. पथके डिसेंबर अखेपर्यंत तपासणी अहवाल सादर करतील. रुग्णालयांच्या यंत्रणेत त्रुटी आढळल्यास, त्यात तात्काळ सुधारणा केली जाईल.
– शशिकांत काळे, मुख्य अग्निशमन अधिकारी, ठाणे