मोमोज हा मूळ तिबेटमधील नाश्त्याचा प्रकार आहे. पूर्वाचलात ठिकठिकाणी तो आढळतो. मोदकाला जसे उकडीचे पीठ वापरले जाते, तसेच मोमोजमध्येही ते वापरले जाते. त्या पिठात भरलेले सारण मात्र निराळे असते. कधी त्यात चिकन तर कधी मटणाचे तुकडे असतात. खास शाकाहारी खवय्यांनाही मोमोज उपलब्ध आहेत. त्यात सारण म्हणून पनीर, चीज तसेच चक्क भाज्याही असतात. या मोमोजचेही दोन प्रकार आहेत. एक वाफवलेले तर दुसरे तळलेले. मूळच्या या तिबेटीयन खाद्य पदार्थात महाराष्ट्रीय जिन्नस मिळवून ठाणेकर तरुणांनी त्याला खास आपली चव दिली आहे. एखाद्या पाश्चात्त्य कलाकृतीवर आधारित पण अस्सल भारतीय बाजाची कलाकृती साकारावी त्याप्रमाणे ‘अॅप्पेटाइट’चे मोमोज हा एक खास देशी पदार्थ आहे.
व्हाइट सॉस आणि शेजवान सॉससोबत मोमोजची चव द्विगुणित होते. शाकाहारी तसेच मांसाहरी मोमोजमध्येही वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. शाकाहारी मोमोजमध्ये पनीर आचारी मोमो, चिली चीज मोमो, साधे पनीर असे लज्जतदार पर्याय खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. मांसाहारावर ताव मारणाऱ्यांसाठी मटण नवाबी, चिकन अचारी, चिली चीज चिकन, तसेच अंडे वापरून तयार केलेले क्रीमी एग मोमो असे विविध प्रकार या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मोमोजची लज्जतदार आणि चटकदार चव ठाणेकरांच्या पसंतीस उतरली आहे. ठाणे आणि आसपासच्या खवय्यांचा वाढणारा प्रतिसाद पाहता अॅप्पेटाइटची आणखी एक शाखा नुकतीच मुंबईत कांजूरमार्ग येथे सुरू झाली आहे. या शाखेलाही खाबूमोशायांचा असाच जोरदार प्रतिसाद मिळेल, असा विश्वास अविनाश विश्वकर्मा आणि राहुल पवार यांना आहे.
ठाण्यामधील उत्सवांचा वाढणारा उत्साह पाहता, विविध सणांसाठी वेगवेगळ्या चवीचे मोमोज येथे मिळतात. गणेशोत्सवामध्ये ‘हनी पेपर मोमोज’ हे खास खाण्यासाठी गर्दी होते. ‘यंगस्टर’ची वाढती ओढ लक्षात घेऊन चालकांनी मोफत ‘वायफाय’ची व्यवस्था केली आहे.
शलाका सरफरे / समीर पाटणकर
मोमोज गट्टम..
महाराष्ट्रीय खाद्यपदार्थामध्ये वैशिष्टय़पूर्ण असलेल्या मोदकांशी साधम्र्य असलेले पूर्वाचलातील मोमोज हल्ली ठाणेकर खवय्यांच्या पसंतीस उतरू लागले आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 24-01-2015 at 12:37 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane foodie people preferred momo restaurant