ठाणे : पदपथावर झोपलेल्या एका कचरा वेचकाच्या शरिरावरून बेदरकार मोटार गेल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. अजय (२८) असे मृताचे नाव असून याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय हा एका कचरा वेचकाकडे काही दिवसांपूर्वीच कामाला लागला होता. परिसरातील कचरा वेचून तो उदरनिर्वाह करत होता. तसेच तो दररोज सिडको बसथांब्या लगत असलेल्या महाविद्यालयाच्या पदपथावर झोपायचा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी रात्री ११.३० वाजता तो पदपथावर झोपला असताना भरधाव मोटार त्यांच्या छातीवरुन गेली. घटनेची माहिती अजय यांच्या मित्रांना मिळाल्यानंतर त्यांना त्याच मोटारीतून कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात मोटार चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.