ठाणे महापालिकेचा वनविभागाकडे प्रस्ताव
ठाणे शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ७०० मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ठाणे महापालिकेने नवी मुंबईचे दरवाजे ठोठविण्यास सुरुवात केली असून शिळ-नवी मुंबईच्या वेशीवर आडिवली-भूतवली परिसरातील सुमारे १८ एकर क्षेत्रफळाची विस्तीर्ण जमीन त्यासाठी मिळावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव वनविभागाकडे पाठविण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या जमिनीच्या हस्तांतरणास वनविभागानेही तत्त्वत: मान्यता दिल्याचे विश्वसनीय वृत्त असून या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने क्षेपणभूमी उभारण्याची तयारी महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाणे शहराचे झपाटय़ाने नागरीकरण होत असल्याने गेल्या काही वर्षांत घनकचरा निर्मितीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे स्वत:ची क्षेपणभूमी नाही. त्यामुळे दिवा परिसरात खासगी जमिनींवर तसेच खाडीकिनारी कचरा टाकला होता. मध्यंतरी पर्यावरण विभागाने ठाणे महापालिकेस याप्रकरणी नोटीस बजावली होती. कल्याण-डोंबिवली शहरात कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्याने या शहरांमधील नव्या बांधकामांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. हाच न्याय ठाणे महापालिकेसही लागू शकतो अशी भीती वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाटू लागली असून त्यामुळे जागेचा युद्धपातळीवर शोध सुरू करण्यात आला आहे.
ठाण्याचा कचरा नवी मुंबईच्या वेशीवर
ठाणे महापालिकेचा वनविभागाकडे प्रस्ताव
Written by जयेश सामंत
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 12-02-2016 at 02:56 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane garbage on navi mumbai border