ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांमध्ये म्हणजेच, जानेवारी ते जून या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात १९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना ठाणे पोलिसांनी हातोहात पकडले आहे. मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ११ जणांना पोलिसांनी अटक केली होती. यावर्षी सापळ्यांमध्ये वाढ झाली असून अटकेत असलेल्या आरोपींची संख्याही वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मागील वर्षांचे मुल्यांकन, दंड रद्द करण्यासाठी आणि वस्तू आणि सेवा कराचे नवे खाते काढून देण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या साहाय्यक राज्यकर आयुक्त धनंजय शिरसाठ याला २० लाख रुपयांची लाच घेताना मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. त्यामुळे सरकारी खात्यामध्ये लाचेची मागणी होत असल्याचा मुद्दा उपस्थित होत आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी शहरात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी ते १४ जून या कालावधीत १३ सापळे रचण्यात आले.

या १३ कारवाईमध्ये पोलिसांनी १९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यामध्ये पोलीस, महापालिका, महावितरण, वन विभाग, महसूल विभाग, पाणी पुरवठा विभाग, वस्तू आणि सेवा कर विभाग यांंसारख्या विभागांचा सामावेश आहे. सर्वसामान्य नागरिकांची अडलेली कामे पूर्ण करून देण्यासाठी लाचेची मागणी होत असल्याचे कारवाईत उघड झाले आहे.

२०२१ मध्येही १ जानेवारी ते १४ जून या कालावधीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण १० सापळे रचले होते. या कारवाईत पोलिसांनी ११ जणांना अटक केली होती. या कारवायांमुळे शासकीय विभागात भ्रष्टाचाराची कीड अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.