ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांनी आचारसंहिता लागू झाल्यानंतर चार हजार प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. तसेच १५५ अवैध शस्त्र जप्त करण्यात आले असून यातील १७ अग्निशस्त्र आणि ४० काडतूसे आहेत. ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ४ हजाराहून अधिक बुथ आणि ९५३ मतदान केंद्र असणार आहेत. त्यामुळे सुमारे ७ हजार पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात असणार आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. ठाणे जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण मतदारसंघ येतो. या मतदारसंघातील बहुतांश भाग ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात येतो. तर, उर्वरित नवी मुंबई, मिरा भाईंदर आणि ठाणे ग्रामीण पोलीस क्षेत्रातील भाग येतो. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून शहर पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. ठाणे शहर पोलिसांचा सुमारे आठ हजारांचा बंदोबस्त आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव दलाच्या तुकड्या, दंगल नियंत्रण पथक यासह सुमारे सात हजारांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ४ हजार ९२ बुथ असणार आहेत. तर ९५३ मतदान केंद्र आहेत. येथेही कडेकोट फौजफाटा तैनात असेल.

thane model code of conduct crime loksatta news
आचारसंहिता भरारी पथकाचीच खंडणीखोरी, शेतमालाच्या पैशांवर डल्ला, १३ दिवसांनंतर गुन्हा दाखल
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
bombay high court slams bmc officer over cm order
मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला महत्व नाही का? उच्च न्यायालयाची महापालिका प्रशासानाला विचारणा
80 lakh cash worth rs 17 lakh mephedrone seized in pimpri chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये ८० लाखांची रोकड, १७ लाखांचे मेफेड्रोन जप्त
excise department registered 226 cases of illegal liquor traffic in suburbs
अवैध मद्य वाहतुकीबद्दल उपनगरात २२६ गुन्हे दाखल
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव

हेही वाचा – माणकोली उड्डाण पुलांवरील वाहनांमुळे रेतीबंदर फाटकात दररोज वाहन कोंडी, वाहतूक पोलीस नसल्याने स्थानिकांकडून नियोजन

ठाणे पोलिसांनी मागील महिन्याभरापासून रात्री तसेच दिवसा गस्ती घालून कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. संशयास्पद व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. या कारवायांत पोलिसांनी १५५ प्राणघातक शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. त्यामध्ये १७ अग्निशस्त्रांचा सामावेश आहे. तसेच निवडणुकांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ४ हजार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या १२ जणांविरोधात तर अवैध मद्य विक्रीच्या २३४ कारवाया केल्या आहेत. राज्यात गुटखा विक्री करण्यास प्रतिबंध आहे. गुटखा वाहतुकीच्या १७ जणांविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – “मनसेच्या मूळ इंजिनमुळे ट्रिपल इंजिन महायुती सरकारला आणखी गती”, मनसेचे आमदार राजू पाटील यांची मिश्किल टिपणी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली नार्को – को-ऑर्डिनेशन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई, मिरा भाईंदर, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग, जिल्हा आरोग्य, वन विभाग यासह इतर शासकीय यंत्रणांची बैठक पार पडली. यावेळी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यात परदेशातून येणाऱ्या अमली पदार्थावर करडी नजर ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत.