ठाणे : कौटुंबिक वाद सुरू असताना मांजरीचे पिलू घरामध्ये आल्याने ३९ वर्षीय व्यक्तीने त्या पिलाला जमिनीवर आपटून मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिलाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी मांजराच्या पिलाला मारणाऱ्या तरुणाच्या वडिलांनीच तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – सैफ आली खानचा हल्लेखोर बांगलादेशी निघताच आव्हाड यांच्यावर नरेश म्हस्के यांची टीका

हेही वाचा – ठाणे : कांदळवनाच्या जंगलात असा सापडला सैफ अली खानचा हल्लेखोर

तक्रारदार हे भिवंडीतील राहनाळ भागात वास्तव्यास असून ते प्राणी मित्र आहेत. त्यांच्यासोबत त्यांची मुले राहतात. तक्रारदार हे परिसरातील भटके श्वान, मांजरी यांना नेहमी खाद्य खाऊ घालतात. त्यामुळे त्यांच्या घरात भटके श्वान, मांजरी येत असतात. तक्रारदार यांच्या मोठ्या मुलाला मद्य पिण्याचे व्यसन आहे. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १७ जानेवारीला ते घरामध्ये असताना त्यांचा मुलगा मद्य पिऊन आला. तसेच त्यांच्यासोबत वाद घालू लागला. घरातील साहित्य देखील त्याने फेकून देण्यास सुरूवात केली. यास तक्रारदार विरोध करु लागले. त्याचवेळी एक भटके मांजरीचे पिलू घरामध्ये आले. त्यावेळी तक्रारदार यांच्या मुलाने त्या पिलाला उचलून जमिनीवर आपटले. पिलाच्या तोडांतून रक्तस्त्राव झाल्याने त्या पिलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती तक्रारदार यांनी नारपोली पोलीस ठाण्यात दिली. या माहितीच्या आधारे नारपोली पोलीस ठाण्यात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (अ), ११ (१) (१) आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane kitten died by hitting the ground ssb