ठाण्यातील मेट्रो प्रकल्पाचा अहवाल मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे
ठाणे : ठाणे महापालिकेने तयार केलेल्या तब्बल नऊ हजार ६७४ कोटी रुपयांच्या अंतर्गत मेट्रो प्रकल्पाचा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. ‘महामेट्रो’ने यासंबंधीचा प्रकल्प अहवाल तयार केला असून २९ किलोमीटरच्या मार्गापैकी २६ किलोमीटरचा मार्ग उन्नत तर तीन किमीचा मार्ग भुयारी करण्याचे प्रस्तावित आहे.
संभाव्य प्रवासीसंख्या
अहवालानुसार २०२५ मध्ये अंतर्गत मेट्रोमधून दररोज ५.७६ लाख, २०३५ मध्ये ७.६१ लाख आणि २०४५ मध्ये ८.७२ लाख प्रवासी ये-जा करतील. या मेट्रोचा वेग प्रति तास ८० किमी इतका असणार आहे. तसेच कासावडवली येथील १८ हेक्टर जागा देखभाल सुविधेकसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, धातूशोधक, अशा उपाययोजनाही केल्या जाणार आहेत.
अपेक्षित खर्च
अंतर्गत मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी नऊ हजार ६७४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून याबाबत महापालिका प्रशासनाची राज्य शासनाशी नुकतीच प्राथमिक चर्चा झाली आहे. ही मेट्रो सेवा विकसित करण्यासाठी येणाऱ्या भांडवली खर्चाची तरतूद शासन अनुदान, कमी दराची कर्ज उभारणी आणि ठाणे पालिकेच्या अर्थसंकल्पातून केली जाईल, असे या अहवालात म्हटले आहे.
अंतर्गत मेट्रोचे स्वरूप
नवीन स्टेशन, घोडबंदर आणि ठाणे स्टेशन अशी वर्तुळाकार मार्गिका असेल. २२ स्थानके प्रस्तावित असून ठाणे स्थानक ते प्रस्तावित नवीन स्थानकापर्यंतची मार्गिका भुयारी तर उर्वरित उन्नत असणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरतील अंतर्गत वाहतूक सेवा अधिक जलद होणार असून वाहतूक कोंडी सुटेल, असा दावा प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रकल्पाची आखणी पूर्णत ठाण्याच्या पश्चिम भागासाठी करण्यात आली आहे. साकेत, वागळे इस्टेट पुढे वर्तकनगर, उपवन आणि घोडबंदर मार्गातील वेगवेगळ्या भागांत हा मार्ग आखण्यात आला आहे.