ठाणे : शहरात उभारण्यात येणारे बेकायदा जाहिरात फलक, पोस्टर्स आणि कमानीविरोधात तक्रारी नोंदविण्यासाठी सुरू केलेला मदत कक्ष दूरध्वनी क्रमांक बंद असल्याचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पालिका प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर करून हा क्रमांक सुरू केला आहे. यामुळे नागरिकांना तक्रार करण्याची सुविधा पुन्हा उपलब्ध झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि चौकांमध्ये गेल्या काही वर्षांपासून बेकायदा फलक उभारले जात आहेत. शहराच्या विविध भागात पोस्टर्स लावले जात आहेत. राजकीय नेत्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणारे फलक त्यांच्या समर्थकांकडून शहरभर लावले जातात. त्यांच्या पद निवडीचे आणि अभिनंदनाचे फलक लावले जातात. यातील बहुतांश फलकांसाठी समर्थकांकडून पालिकेची परवानगी घेण्यात येत नाही. मिळेल त्या जागी हे फलक उभारले जात असल्याने शहराचे विद्रुपीकरण होते. शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरणारे बेकायदा जाहिरात फलक, पोस्टर्स आणि कमानीविरोधात नागरिकांना तक्रार करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईनची सुविधा सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मध्यंतरी पालिकांना दिले होते. त्यानुसार ठाणे महापालिकेने १८००-२२२-१०८ हा मदत कक्ष क्रमांक सुरू केला होता.

Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
High Court warns State Governments Urban Development Department over implementation of fire safety rules
अन्यथा सर्व बांधकामांच्या परवानग्या रोखू, अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीवरून न्यायालयाचा इशारा
Attention of Navi Mumbai people to the decision to abolish CIDCO transfer fee
सिडको हस्तांतरण शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष
Mumbai Municipal Corporation will conduct a survey of sanitation workers Mumbai
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे महापालिका सर्वेक्षण करणार; विभागीय कार्यालयाच्या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन
Objection notice submitted by consumer panchayat on housing policy regarding ownership of Zopu plot Mumbai news
झोपु भूखंडाची मालकी विकासकांना देण्यास विरोध! गृहनिर्माण धोरणावर ग्राहक पंचायतीकडून हरकती-सूचना सादर
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर

हेही वाचा – डोंबिवलीतील गुंडगिरी मोडण्यासाठी २४ जणांना मोक्का

शहरातील बेकायदा फलकांची नागरिकांकडून माहिती मि‌ळवून त्यावर कारवाई करता यावी, या उद्देशातून हा क्रमांक सुरू करण्यात आला होता. परंतु हा क्रमांक ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी जोडण्यात आलेला आहे. परंतु हा क्रमांक बंद असल्याची बाब समोर आली होती. यामुळे नागरिकांना तक्रारी करणे शक्य होत नव्हते. या संबंधीचे वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. यानंतर खडबडून जाग आलेल्या पालिका प्रशासनाने हा क्रमांक सुरू केला आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे हा क्रमांक बंद झाला होता. याबाबत पालिका प्रशासनाने प्रभादेवी येथील एमटीएनएल विभागाकडे तक्रार करताच या विभागाने तांत्रिक अडचणी दूर करून हा क्रमांक सुरू केला, अशी माहिती सुत्रांनी दिली.