ठाणे : एमआयडीसीमार्फत जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असून या कामामुळे कळवा, मुंब्रा आणि दिवा भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी दिवसभर बंद राहणार आहे. या बंदनंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ठाणे : वृद्धाची ६८ लाख रुपयांना फसवणूक

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेतील कटाई नाका ते मुकंद कंपनीपर्यतच्या जलवाहिनीवर तातडीच्या देखभाल दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. या कामामुळे, गुरूवार, २८ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपासून ते शुक्रवार, २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत असा २४ तासांसाठी कटाई ते ठाणे दरम्यान पाणी पुरवठा बंद राहणार आहे. परिणामी या काळात ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा आणि दिवा परिसरात पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पाणी पुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील काही तास कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे या काळासाठी नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, तसेच, पाणी जपून वापरावे, असे आवाहन ठाणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane mumbra kalwa diva no water supply on friday css