महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वसतीगृहाच्या नूतनीकरणाचे काम येत्या चार महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. वसतीगृहाच्या नूतनीकरण कामाची आखणी, निविदा प्रक्रिया, प्रत्यक्ष कामाची प्रगती याचा दिवसवार आराखडा तयार करून त्याप्रमाणे जलद काम करण्याचे आदेशही त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.

हेही वाचा >>> कल्याण : शिळफाटा रस्ते बाधितांना मोबदला देण्याचा मार्ग मोकळा; शिळफाटा रस्ते संघर्ष समितीच्या आंदोलनाला यश

Municipal Corporation issues notice to 32 private hospitals in Ahilyanagar city
अहिल्यानगर शहरातील ३२ खासगी रुग्णालयांना महापालिकेची नोटीस
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Three new Assistant Commissioners to Mumbai Municipal Corporation Mumbai print news
मुंबई महानगरपालिकेला तीन नवे साहाय्यक आयुक्त
infosys Layoffs
Infosys ने ४०० प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने काढून टाकले, सहा वाजेपर्यंत कँम्पस सोडण्याचे आदेश
Commissioner and Administrator of Ichalkaranji Municipal Corporation Omprakash Divate
इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासकांचा पदभार काढून घेतला
jitendra awads broadcast thane municipal corporation demolished illegal construction in Mumbra
जितेंद्र आव्हाडांच्या थेट प्रेक्षपणानंतर पालिकेकडून ‘ती’ इमारत जमीनदोस्त, मुंब्र्यात भररस्त्यावर अनधिकृत इमारतीचा घाट
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
Nimbalkar brothers wealth investigation by income tax department
सातारा : निंबाळकर बंधूंच्या घरांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, दिवसभर चौकशी सुरू; फलटणमधील निवासस्थानाबाहेर गर्दी

राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या निवासी डॉक्टरांना सर्वोच्च दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून त्याची तत्काळ अमलबजावणी केली जावी, अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सोमवारी निवासी डॉक्टरांच्या रुग्णालय परिसरातील तिन्ही वसतीगृहांची पाहणी करून बैठक घेतली. सध्या उपहारगृहाच्या वरती असलेल्या वसतीगृहाच्या मुख्य इमारतीमध्ये ७८ आणि रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमधील वसतीगृह क्रमांक ०८ मध्ये २८ निवासी डॉक्टर राहतात. त्यापैकी वसतीगृहाच्या मुख्य इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्याची गरज आहे. इमारतीचे बांधकाम परिक्षण करण्याबरोबरच अंतर्गत भागाची दुरुस्ती, स्नानगृह, शौचालय यांची पुरेशी व्यवस्था, खोलीच्या आतील रचना यांच्यात आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे आयुक्त बांगर यांनी बैठकीत सांगितले. या वसतीगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण करताना त्यात एकूण १०० निवासी डॉक्टरांच्या राहण्याची व्यवस्था केली जावी. तसेच, पुरेसा सूर्यप्रकाश, वायुविजन यासाठी आवश्यक ते बदल केले जावेत. व्यायामशाळेची रचना चांगली करावी. प्रवेशद्वारे मोठी आणि कोणत्याही अडथळ्याविना असतील हे पहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

हेही वाचा >>> मासिक पाळीवरून संशयातून भावाकडून बहिणीची हत्या; उल्हासनगरातील संतापजनक घटना, आरोपी भाऊ अटकेत

सध्याच्या उपहारगृहाच्या स्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेषत: स्वच्छतेचा अभाव ही दुर्लक्षित करण्याजोगी गोष्ट नाही. त्यामुळे, नवीन रचनेत या सर्व गोष्टींचा विचार केला जावा. तसेच, कॅफेटरिया किंवा खाणावळ (मेस) यापैकी नेमका कोणता पर्याय हवा याबद्दल निवासी डॉक्टरांचे मत जाणून घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले. उपहारगृहाच्या एकूण व्यवस्थेबाबत त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचे मतही जाणून घेतले. वसतीगृहाच्यासमोर आणि मागील बाजूस असलेल्या जागेचा वापर निवासी डॉक्टरांना क्रीडा सुविधा देण्यासाठी करावा. त्यांच्याशी चर्चा करून खेळासाठी लागणारी व्यवस्था उभी करावी. वसतीगृहालगतच्या मोकळ्या जागेत अभ्यास, मनोरंजन यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच त्या सेवा उपहारगृहाशी जोडून घ्याव्यात असेही त्यांनी स्पष्ट केले. अभ्यास, प्रशिक्षण आणि निवासी सुविधा उत्तम दर्जाच्या देण्यासाठी राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयाचा नावलौकिक व्हावा. म्हणजे विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळेल आणि छत्रपती शिवाजी रुग्णालयाला चांगले डॉक्टर मिळतील, असेही ते म्हणाले. वसतीगृहाच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यासाठी सध्या तिथे राहणाऱ्या निवासी डॉक्टरांची तात्पुरती व्यवस्था एका महिन्यात तयार करून घ्यावी. ही व्यवस्था करताना, रुग्णालयाच्या कामकाजावर परिणाम होणार नाही, अशा पद्धतीने निवासी डॉक्टरांचे स्थलांतर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. छत्रपती शिवाजी रुग्णालयाच्या परिसरात आल्यावर येणारा ‘तो’ ठराविक दर्प ठरवून दूर करायला हवा. योग्य स्वच्छ्ता आणि चांगल्या दर्जाची जंतूनाशके वापरली तर रुग्णालय परिसर दर्प मुक्त करणे शक्य आहे, असेही ते म्हणाले. त्याचबरोबर, रुग्णालय आवार, इमारती यात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Story img Loader