लोकसत्ता खास प्रतिनिधी

ठाणे: मुंब्रा, दिवा, कोपर येथे रेतीचे उत्खनन सुरू असल्याने भविष्यात रेल्वे मार्गाला धोका निर्माण होण्याची भिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली असून याकडे महसुल विभागाला लक्ष देण्याची सुचना त्यांनी केली आहे. याशिवाय, पावसाळ्यात रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी गटार सफाईबरोबरच वृक्षांच्या फांद्याची छाटणी करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या आहेत.

makarand deshpande starrer movie pani puri
आहे चटकदार पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Supreme Court on bulldozer action (1)
अतिक्रमणविरोधी कारवाईवेळी ‘हे’ नियम पाळा, थेट सर्वोच्च न्यायालयानंच घालून दिली नियमावली!
Malvan Shivputla accident case Hearing on bail plea of ​​Jaideep Apte Chetan Patil in High Court Mumbai news
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण: जयदीप आपटे, चेतन पाटीलच्या जामीन याचिकेवर उच्च न्यायालयातच सुनावणी
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
Eknath Shinde, Eknath Shinde news, Jitendra Awhad latest news,
ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या नावाने करोडोंची वसुली, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
bombay hc reject builder bail over illegal housing projects
बेकायदा गृहप्रकल्प राबवणाऱ्यांवर कारवाई गरजेची; विकासकांना जामीन नाकारताना उच्च न्यायालयाची टिप्पणी

ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेल्या सर्व यंत्रणांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सुचना केल्या. मुंब्रा, दिवा, कोपर येथे रेतीचे उत्खनन सुरू असल्याची बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत मांडली. या उत्खननामुळे रेल्वे मार्गाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर रेती उत्खननामुळे भविष्यात रेल्वे मार्गाला धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त करत याकडे महसुल विभागाने लक्ष द्यावे, अशी सुचना आयुक्त बांगर यांनी केली आहे.

हेही वाचा… डोंबिवलीतील देवीचापाडा येथील रस्त्याला बाधित बेकायदा इमारत जमीनदोस्त करा,आयुक्तांचे ह प्रभाग अधिकाऱ्यांना आदेश

पावसाळ्यात रेल्वे मार्ग सुरळीत राहण्यासाठी मुलुंड ते दिवा या पट्ट्यातील सर्व नाल्यांची काळजीपूर्वक सफाई केली जावी. रेल्वेच्या हद्दीतील नाले सफाई, गटारे सफाई यंत्राद्वारे करणे शक्य नसेल तर मनुष्यबळाचा वापर करून गाळ काढला जावा, अशी सुचनाही त्यांनी केली. वाघोबा नगर, भास्कर नगर येथील अतिक्रमणामुळे रस्ता खचला आहे. कुपण भिंतीच्या वर असलेली बांधकामे रेल्वेसाठी धोकादायक ठरू शकतील. या भागाची पाहणी करून योग्य तो उपाय करावा, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच हे काम पावसाळ्यानंतर होणार असल्याने रेल्वे आणि पालिका या दोन्ही यंत्रणांनी या वेळच्या पावसाळ्यात अधिक सतर्क राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा… विकास योजना आणि महसूल हद्दींमधील असमानतेमुळे बांधकाम परवानग्यांमध्ये घोळ, कडोंमपा हद्दीतील बांधकाम परवानग्या थांबविण्याची मागणी

पारसिक बोगद्यावरील काही झाडेही धोकादायक झाली आहेत, तर रेल्वे लगतच्या इमारतींमधील सुमारे ७२ झाडांच्या फांद्या रुळांवर येत आहेत, त्यांची छाटणी लवकर व्हावी, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्यान विभागाने हे काम प्राधान्याने करावे, अशा सुचना बांगर यांनी केल्या. नौपाडा आणि कोपरी येथे रेल्वे रुळांवर पाणी येवू नये म्हणून पट्ट्या टाकल्या जातात. त्यामुळे पाणी तेथे अडून माघारी येते. त्यामुळे, पाणी नियमित वाहत असेल तेव्हा पट्टी टाकली जावू नये, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले. याच भागात छोटे भुयारी गटार केले तर ठाणे यार्ड मधील पाणी साठण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, कोपरी येथील चिंधी मार्केटमधील कचरा रेल्वे हद्दीत टाकला जातो, त्यामुळे आतील गटारे तुंबतात, ही बाब रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिली. भुयारी गटार बांधण्यासाठी नियोजन पावसाळ्यात करून घ्यावे आणि पावसाळा संपला की बांधकाम करावे, तसेच चिंधी मार्केट मधील कचऱ्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा, अशा सुचना आयुक्त बांगर यांनी केल्या.

नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा

कौसा, शीळ, डायघर, दिवा या भागात मातीची भरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे नैसर्गिक मार्ग बंद होत आहेत. या भागात नाले काढण्यासाठी स्थानिक विरोध करतात. तेथे तहसीलदारांनी हस्तक्षेप करून नाल्यांसाठी मार्ग काढून द्यावा, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.