ठाणे : महापालिका शाळा इमारतींच्या दुरावस्थेमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाने शाळा इमारतींच्या दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली होती. परंतु, सहा महिन्याच्या कालावधीत ३४ पैकी केवळ ५ शाळांची कामे पुर्ण झाली आहेत तर, उर्वरित कामे संथगतीने सुरू असल्याची बाब पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधित अभियंत्यांना नोटीस बजावल्या आहेत. विहित मुदतीत नोटीसवर खुलासा केला नाही, तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी अभियंत्यांना दिला आहे. यामुळे शाळा दुरुस्ती कामातील संथगतीमुळे अभियंते अडचणीत आल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिकेच्या अनेक शाळा इमारतींची दुरावस्था झाली आहे. काही शाळा इमारतींचे प्लास्टर पडत आहे. या दुरावस्थेमुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शाळा इमारतींच्या दुरुस्तीचे काम प्राधान्याने हाती घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार शाळा इमारतींच्या दुरुस्तीसाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला होता. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने शाळा इमारतींच्या दुरुस्तीचा सविस्तर प्रस्ताव तयार केला होता. त्यानुसार पालिकेच्या एकूण ३४ शाळा इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार होती. या कामांचे कार्यादेश सहा महिन्यांपुर्वी म्हणजेच २०२३ मध्येच ठेकेदारांना देण्यात आले होते.

Aatkoli dumping ground Thane corporation FIR registered
ठाणे पालिकेच्या आतकोली कचराभुमीवर दगडांसह पाण्याची चोरी, पालिका प्रशासनाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
women naga sadhu life
कसे असते महिला नागा साधूंचे जीवन? त्यांचा पेहराव…
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
वाकडमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; १३७ शेड, १८ घरे जमीनदोस्त
Maharashtra ST Bus Service
एसटीच्या इलेक्ट्रिक बस तोट्यात, सरासरी एका किलोमीटर मागे…
dhananjay munde
मुंडेंच्या बंगल्यावर खंडणीसाठी बैठक; भाजप आमदार सुरेश धस यांचा आरोप
loksatta readers feedback
लोकमानस: पिढ्या बरबाद करणारे धोरण
Ramdas Athawale Devendra Fadnavis Mayor post pune corporation
‘ उपमहापौर’ केले आता ‘ महापौर’ करा, रामदास आठवलेंची मागणी ! मंत्रीमंडळात स्थान देऊन देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळावा

हेही वाचा : कल्याणमध्ये किराणा दुकान मालकांकडून खोकल्याची औषधे जप्त

ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले होते. परंतु सहा महिन्यांचा काळ लोटत आला तरी शाळा इमारतींची कामे संथगतीनेच सुरू असल्याची बाब आयुक्त बांगर यांच्या निदर्शनास आली असून या संदर्भात त्यांनी अभियंत्यांना नोटीस पाठवून जाब विचारला आहे. महापालिकेच्या शाळा भौतिकदृष्ट्या सुस्थितीत असाव्यात, शाळांमध्ये गळती नसावी, शौचालय सुस्थितीत असावेत तसेच रंगरंगोटीसहीत शाळेतील परिसर देखील सर्व नीटनेटका असावा यासाठी शाळांच्या दुरूस्तींची कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे गुणवत्तेने होणे तर आवश्यक आहे. त्याचबरोबर ही कामे कालमर्यादेमध्ये पूर्ण होणेही गरजेचे आहे, याबाबत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही अशा सूचना त्यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

हेही वाचा : कल्याणमधील मलंग गड रस्त्यावरील भाल गावातील चाळी जमीनदोस्त

पालिकेच्या एकूण ३४ शाळा इमारतींची दुरुस्ती करण्यात येणार होती. त्यासाठी १४ कोटी ९९ लाख ९५ हजार रुपयांची एकत्रित निविदा काढण्यात आली होती. निविदा प्रक्रिया उरकून ठेकेदारांना ८ मार्च रोजी कामाचे कार्यादेश देण्यात आले होते. ३४ पैकी ५ शाळांच्या दुरूस्तीचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर ९ शाळांच्या दुरूस्तीचे काम ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाले असून ही कामे प्रगतीपथावर आहे. परंतु ८ शाळांच्या दुरूस्तीचे काम संथगतीने सुरू असून ही कामे अत्यंत असमाधानकारक आहेत. तर १२ शाळांच्या दुरूस्तीच्या कामाची सुरूवात झालेली नाही. ज्या शाळांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत आणि ज्या शाळांची कामे धीम्या गतीने सुरू आहेत, अशा संबंधित कार्यकारी अभियंत्यांना आयुक्त बांगर यांनी नोटीस बजावल्या आहेत. विहित मुदतीत नोटीसवर खुलासा केला नाही, तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader