ठाणे : ठाणे महापालिकेने डिसेंबर महिन्यात ३ हजार ८९१ अनधिकृत फलकांवर कारवाई केली आहे. तर, ७६ प्रकरणात गुन्हे दाखल केले. अनधिकृत फलक हटवण्याची मोहीम सातत्याने सुरू ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे शहरात मोठ्याप्रमाणात बेकायदेशिररित्या फलक उभारले जात आहेत. या फलकांमुळे शहर विद्रूप होते. फलकांविषयी नागरिकांकडून तक्रारीही प्राप्त होतात. ठाणे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती मार्फत डिसेंबर महिन्यात ३ हजार ८९१ अनधिकृत फलक हटवण्यात आले. तर एकूण ७६ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती उपायुक्त शंकर पाटोळे यांनी दिली.

हेही वाचा – ठाणे : नव्या कळवा पुलावरील सुरक्षा साधने गायब, सुरक्षा साधने चोरीला गेल्याचा महापालिकेचा दावा

अनधिकृत फलक आढळला तर त्यावर नोटीस आणि गुन्हे दाखल करणे ही कारवाई अतिशय प्रभावीपणे करण्यात यावी, असे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. तसेच, ठाणे महापालिका हद्दीत अधिकृत फलक उभारण्यासाठी जाहिरात विभागाने जागा निश्चित केल्या आहेत. त्याचे शुल्क भरून केवळ त्याच ठराविक भागात फलक उभारता येणार आहेत. अशी माहिती पाटोळे यांनी दिली.

हेही वाचा – … आणि दुर्मिळ गिधाडाने पुन्हा आकाशात झेप घेतली, युरेशियन ग्रिफॉन जातीच्या गिधाडावर यशस्वी उपचार

प्रभाग – हटवण्यात आलेले फलक – गुन्हे

नौपाडा-कोपरी – ७६२ – ११

वागळे इस्टेट – ३७३ – ०२

लोकमान्य/सावरकर नगर – ३४२ – १०

वर्तकनगर – ४५३ – ०६

माजिवडा-मानपाडा – ३५३ – ०७

उथळसर – ३३८ – ०३

मुंब्रा – ४५६ – १५

कळवा – ४०९ – १८

दिवा – ४०५ – ०४.

एकूण – ३८९१ – ७६

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation action against around 4000 unauthorized boards so 76 cases were registered ssb