ठाणेकरांचा खड्डेमुक्त प्रवास व्हावा यासाठी महापालिकेमार्फत विविध ठिकाणी रस्ते बांधणीची कामे सुरू असून या कामांसाठी सल्लागार आणि त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षणासाठी आयआयटीची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेतला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्वक होण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत एकाच दिवशी चार दुचाकी वाहनांचा चोऱ्या

Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mumbai , Green area, sea coast , greenery,
सागरी किनारा मार्गालगत तयार करणार हरित क्षेत्र, पालिकेचा पैसा खर्च न करता हिरवळ तयार करण्यासाठी कंपन्यांकडून अर्ज
Reserved roads in MHADA colonies belong to the municipal corporation Mumbai news
म्हाडा वसाहतींतील आरक्षित रस्ते पालिकेकडे; ‘जैसे थे’ स्थितीत हस्तांतरण
Agriculture Commissioner, traders ,
शेतीमाल हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा, कृषी आयुक्तांचे आदेश
Loksatta explained Why insist on the post of Guardian Minister of a specific district
विश्लेषण : पालकमंत्रीपदासाठी एवढा अट्टहास का ?
MIDC accelerates Rs 650 crore flyover works including alternative roads in Hinjewadi IT Park
हिंजवडी आयटी पार्क लवकरच ‘कोंडी’मुक्त! पर्यायी रस्त्यांसह उड्डाणपुलाच्या ६५० कोटींच्या कामांना एमआयडीसीकडून गती
will demand to provide additional water storage from Mulshi Dam for Pimpri-Chinchwad says Commissioner Shekhar Singh
…तर मुळशीतून पाणी द्या; आयुक्तांची भूमिका

या बैठकीस आयआयटीचे के.व्ही.कृष्णराव, उपनगरअभियंता रामदास शिंदे उपस्थित होते. पावसाळ्यामध्ये डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. त्याचा त्रास नागरिकांना होतो आणि खड्डे भरणीवर पालिकेला वारंवार निधी खर्च करावा लागतो. असे प्रकार टाळण्यासाठी रस्ते काम परीक्षणासाठी आयआयटीची नियुक्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या आणि नव्याने करण्यात येणाऱ्या रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची व गुणवत्तापूर्वक व्हावी यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कंत्राटदारांनाही आयआयटीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. कंत्राटदारांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्याच्या सूचना आयुक्ताल बांगर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. नव्याने तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याचा आराखडा योग्य पध्दतीने तयार करुन कुठल्याही ठिकाणी पाणी साचणार नाही, रस्त्याच्या साईडपट्टीचे काम, पावसाळी पाण्याचा योग्य निचरा होईल. या दृष्टीने रस्त्यांच्या दुतर्फा गटारे या सर्व गोष्टींचा समावेश करुनच काम करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हेही वाचा >>>डोंबिवलीतील बालभवनमधील गुलाब पुष्प प्रदर्शनाला प्रारंभ; एक हजाराहून अधिक गुलाब पुष्पे प्रदर्शनात

रस्त्याचे काम सुरू असताना प्रत्यक्ष जागेवर जावून कामाची पाहणी करण्यात येईल. यासाठी वापरण्यात येणारे साहित्यांचा योग्य दर्जाचे आहे की नाही याची देखील तपासणी आयआयटीच्या मार्गदर्शकांकडून करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रस्ते बांधकामासाठी लागणारे डांबर ज्या ठिकाणी बनविले जाते, त्या युनिटला भेट देवून त्याची गुणवत्ता तपासली जाईल. तसेच ज्या ठिकाणी प्रत्यक्ष रस्त्याचे काम चालू आहे, त्या साईटवर साहित्य येईपर्यत त्या साहित्याचा तपशील आयआरसीच्या नियमाप्रमाणे राहिल याची दक्षता घेतली जावी, त्यासाठी प्लांटला व्हिजीट देणे, तसेच बांधलेल्या रस्त्याची गुणवत्ता तपासण्यासाठी वेगवेगळ्या चाचण्या आहेत. त्याचा वापर करण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. संपूर्ण काम हे महापालिकेच्या निविदेनुसार होत आहे की नाही यावर देखील कटाक्षाने लक्ष द्यावे. जेणेकरुन रस्त्यांसाठी उपलब्ध केलेल्या निधीचे योग्य विनियोग होवून नागरिकांना चांगले व प्रशस्त रस्ते उपलब्ध होतील असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>ठाणे: गुन्ह्याच्या तपासा दरम्यान सराफा दुकानात पोलीस अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याला मारहाण

सध्या सुरू असलेल्या व नव्याने प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या कामांसाठी वेगवेगळे कंत्राटदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आयआयटीचे पूर्ण लक्ष असले पाहिजे असेही आयुक्त बांगर यांनी बैठकीत सांगितले. सद्यस्थितीत सुरू असलेली कामे फेब्रुवारी अखेरपर्यत व प्रस्तावित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

Story img Loader