ठाणे येथील कोलशेत भागात उभारण्यात आलेल्या नमो सेंट्रल पार्कचे गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले असून हे पार्क शुक्रवारपासून ठाणेकरांसाठी खुले होणार आहे. हे पार्क आठवडयातील कोणत्या दिवशी खुले असेल आणि प्रवेश शुल्क कोणत्या दिवशी कसे असेल, याचे दरपत्रक पालिका प्रशासनाने जाहिर केले आहे. त्याचबरोबर वाहन पार्किंगचे दरही जाहिर केले आहेत. १५ वर्षाखालील मुलांना मात्र पार्कमध्ये विनामुल्य प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ठाणे : महिलांच्या डब्यांत पुरुष फेरीवाल्यांची घुसखोरी

नमो सेंट्रल पार्क प्रत्येक सोमवारी देखभाल व दुरुस्ती कामासाठी बंद ठेवले जाणार आहे. त्याव्यतिरीक्त म्हणजेच मंगळवार ते रविवार या दिवशी सकाळी ६ ते ११ आणि दुपारी ४ ते रात्री ९ यावेळेत उद्यान खुले राहणार आहे. या पार्कचे प्रवेश शुल्क दर पालिका प्रशासनाने जाहिर केले आहेत. १५ वर्षाखालील मुलांना पार्कमध्ये विनामुल्य प्रवेश दिला जाणार आहे. प्रौढांसाठी २० रुपये शुल्क असेल. तर, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी प्रौढांसाठी ३० रुपये शुल्क असेल. ज्येष्ठ नागरिक प्रतिदिवस १० रुपये. पार्कमध्ये फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांकरिता मासिक पासची सुविधा ठेवण्यात आली असून सकाळच्या वेळेकरिता २५० रुपये तर, सकाळ आणि सायंकाळ या दोन्ही वेळेसाठी ५०० रुपये इतकी मासिक पास रक्कम असेल. सायकल प्रवेश शुल्क २० रुपये इतके शुल्क असेल. त्याचबरोबर पार्किंगचे शुल्क जाहिर करण्यात आलेले आहेत. यानुसार चारचाकी वाहनांना ४ तासांकरिता ४० रुपये, चार तासानंतर प्रत्येक तासाला १० रुपये, दुचाकी वाहनांना २० रुपये, ४ तासानंतर प्रत्येक तासाकरिता १० रुपये आणि सायकलकरिता १० रुपये इतके शुल्क असेल, अशी माहिती महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation declared entry fee for namo central park in thane kolshet area zws