ठाणे: यंदा दिवाळीनिमित्ताने ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना १८ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर झाले असले तरी महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता वर्ग-१ च्या १८४ अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान घेऊ नये असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले होते. परंतु या आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी अनेक अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे पत्र भरून प्रशासनाकडे जमा केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली. त्यामुळे आयुक्तांच्या आवाहनाकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> डोंबिवली, कल्याण मधून फेरीवाले गायब; रस्ते, पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांमध्ये समाधान

ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवर ८ हजार २७८ कायस्वरूपी अधिकारी आणि कर्मचारी आहेत, तर अडीच हजारांच्या आसपास कंत्राटी कामगार आहेत. करोनाकाळात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चांगले काम केले होते. त्यामुळे पालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही त्यांना १५,५०० रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. यंदा त्यात अडीच हजारांची वाढ करून १८ हजारांचे सानुग्रह अनुदान जाहीर करण्यात आले. सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संमतीपत्र भरून देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे.

हेही वाचा >>> ठाणे महापालिकेच्या दिरंगाई कारभारामुळे शहराचे विद्रुपीकरण; आमदार संजय केळकर यांचे पालिकेच्या कारभारावर ताशेरे

करोना काळात ठाणे महापालिकेच्या उत्पन्न वसुलीवर परिणाम झाला. जमा-खर्चाचे गणित बिघडल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. त्यातच साडे तीन हजार कोटींचे दायित्व पालिकेवर झाले. करोना काळानंतरही पालिकेच्या उत्पन्न वसुलीत वाढ होत असली तरी ही रक्कम दायित्व कमी करण्यावर खर्ची होत आहे. आता २८ कोटी रुपयांवर दायित्व आले आहे. पालिकेची अर्थिक परिस्थिती लक्षात घेता वर्ग-१ च्या १८४ अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान घेऊ नये असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले होते. अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, कार्यकारी अभियंता, वैद्यकीय अधिकारी, प्रदुषण नियंत्रण अधिकारी, विधी अधिकारी अशा सर्वांचा वर्ग १ च्या अधिकाऱ्यांमध्ये समावेश होते. १८४ पैकी १३० आरोग्य विभागातील अधिकारी आहेत. हे सर्वजण आयुक्तांच्या आवाहनाला प्रतिसाद देतील अशी शक्यता वर्तविली जात होती. पंरतु त्यांनी आवाहनाला प्रतिसाद देण्याऐवजी अनेक अधिकाऱ्यांनी सानुग्रह अनुदान देण्यासंबंधीचे पत्र भरून प्रशासनाकडे जमा केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.