ठाणे : ठाणे शहराच्या कारभाराचे मुख्य केंद्र असलेल्या पाचपाखाडी भागातील ठाणे महापालिका मुख्यालय इमारतीत उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. अधिकाऱ्यांच्या कार्यालयात असलेल्या महत्वाची कागदपत्रे उंदिर कुरतडण्याची भिती व्यक्त होत असून या भितीतूनच अधिकाऱ्यांनी आता आपल्या कार्यालयात उंदिर पकडण्यासाठी पिंजरे ठेवली आहेत. गेल्या काही दिवसांत प्रत्येक केबीनमधून ८ ते १० उंदीर पकडण्यात आल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. या उंदरांच्या सुळसुळाटामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे महापालिकेचा कारभार पाचपाखाडी येथील पालिका मुख्यालय इमारतीतून चालतो. ही तळ अधिक चार मजली इमारत आहे. या इमारतीत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाणी पुरवठा, घनकचरा, शहर विकास, आरोग्य विभाग आणि इतर विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यालये आहेत. याशिवाय, महापालिका मुख्यालय इमारतीत पालिका पदाधिकारी आणि राजकीय पक्षांची कार्यालये आहेत. ठाणे शहराच्या कारभाराचे केंद्र म्हणून पालिका मुख्यालय इमारत ओळखली जाते. शहरातील अनेक विकास कामांचे प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी पालिका करते. या सर्व प्रस्तावांच्या फाईल पालिका मुख्यालयात ठेवण्यात येतात. परंतु या फाईलमधील कागदपत्रे उंदीर कुरतडण्याची भीती व्यक्त होत आहे.

हेह वाचा – डोंबिवलीतील ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करा, उच्च न्यायालयाचे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला आदेश

हेही वाचा – ठाणे जिल्हा नव्या बालगृह आणि वसतिगृहांच्या प्रतिक्षेतच

कार्यालयात अधिकारी आणि कर्मचारी काम करित असतानाही उंदरांचा वावर दिसून येत असून या उंदरांच्या वावरामुळे अधिकारी आणि कर्मचारी हैराण झाले आहेत. या उंदरांना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यालयात पिंजरे ठेवली आहेत. यात उंदीर अडकला की, इमारतीबाहेरील परिसरात सोडून येण्याचे काम कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. गेल्या काही दिवसांत प्रत्येक केबीनमधून ८ ते १० उंदीर पकडण्यात आल्याचे पालिका सुत्रांनी सांगितले. परंतु अद्यापही उंदारांची संख्या कमी होताना दिसत नसल्यामुळे अधिकारी-कर्मचारी हैराण झाले आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणि टेबलांवर महत्वाच्या फाईल ठेवलेल्या असतात. या फाईल उंदरांकडून कुरतडली जाण्याची भिती अधिकाऱ्यांना वाटू लागली असून ते अशा महत्वाच्या फाईल सुरक्षित ठेवण्यासाठी जागा शोधताना दिसून येत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane municipal corporation rat issue cages for catching rats in officers office premises ssb