ठाणे महापालिकेचे संकेतस्थळ अखेर मराठी भाषेत  सुरू करण्यात आले आहे. महापौर संजय मोरे यांच्या हस्ते या नव्या संकेतस्थळाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला.
ठाणे महापालिकेच्या जुन्या संकेतस्थळामध्ये अनेक तांत्रिक अडचणी होत्या. यामुळे भेटी देणाऱ्या ठाणेकरांना माहिती शोधताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेने आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेत स्थळांचा सविस्तर अभ्यास करून नवे संकेतस्थळ तयार केले. तीन वर्षांपूर्वी नवे संकेतस्थळ सुरू करण्यात आले. त्यात पालिकेच्या सर्वच विभागांची माहिती क्रमांक, निविदा,  प्रकल्प तसेच सर्वसाधरण सभा, स्थायी समिती आणि प्रभाग समिती आदींच्या बैठकीतील विषय आणि त्यासंबंधी घेतलेल्या बैठकीचा वृत्तान्त अशी सविस्तर माहिती उपलब्ध होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीन वर्षे प्रतिक्षा
ठाणे पालिकेच्या संकेतस्थळावर इंग्रजीसोबतच मराठी भाषेचा पर्याय होताा. मात्र, त्यावर क्लिक करताच ‘संकेतस्थळ लवकरच मराठी भाषेत’ असे वाक्य गेली तीन वर्षे ठाणेकरांना हेच वाक्य वाचायला मिळत होते. यामुळे संकेतस्थळ मराठीत केव्हा होणार अशी विचारणा होत होती. त्यानंतर ‘लोकसत्ता’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले.