ठाणे: राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. याशिवाय, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे.

ठाणे शहरात ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या उपक्रमांतर्गत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये सौदर्यीकरण आणि स्वच्छता या उपक्रमांचाही समावेश आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील रस्त्यालगतच्या संरक्षक भिंती, उड्डाण पुल, पादचारी पुल याठिकाणी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. शहरातील शासकीय इमारती, उड्डाण पुल, पादचारी पुलांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय, शहरच स्वच्छ ठेवण्यावरही भर देण्यात येत आहे. या उपक्रमांमुळे पालिकेने राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. राज्य सरकारच्या नगरविकास विभागामार्फत शहर सौदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ‘अ’ व ‘ब’ वर्ग महानगरपालिका गटात ठाणे महानगरपालिकेने दुसरा क्रमांक पटकाविला आहे.

हेही वाचा >>>आंबिवली इराणी वस्तीत हाणामारी करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल

याशिवाय, नागरी प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महापालिकांच्या पहिल्या गटातही ठाणे महापालिकेस दुसरा क्रमांक मिळाला आहे. नगरविकास दिनाच्या निमित्ताने गुरूवारी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दुसऱ्या क्रमांकाचे दहा कोटी रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई महापालिकेचे आयुक्त आय. एस. चहल आणि नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित होते.

Story img Loader