ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, चौक, बस थांबे अशा सर्वच ठिकाणी बेकायदा बॅनरबाजी करून शहराचे विद्रुपीकरण करण्यात येत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून असून अशाप्रकारचे ८ हजाराहून अधिक बॅनर हटविण्याची कारवाई पालिकेने गेल्या ११ महिन्यात केली आहे. या कारवाईत बेकायदा बॅनरबाजी प्रकरणी १२५ फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच १ लाखाहून अधिक रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे महापालिका क्षेत्रात काही वर्षांपुर्वी सुशोभिकरणाचे प्रकल्प राबविण्यात आला. यामध्ये शहरातील रस्त्यांलगतच्या भिंतींवर रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. शहरातील चौकांचेही सुशोभिकरण करण्यात आलेले आहे. तलावांचे परिसरही सुशोभित करण्यात येत आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडताना दिसत असतानाच, बेकायदा बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपासून नेत्यांची पदनियुक्ती, वाढदिवसानिमित्त बेकायदा बॅनरबाजी करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. काही जण पालिकेने परवानगी दिलेल्या होर्डींगवर अधिकृतपणे बॅनर लावत आहेत. तर, काही जण पालिकेच्या परवानगी विनाच महामार्ग, रस्त्याच्या दुतर्फा, अंतर्गत रस्ते आणि चौकात बेकायदा बॅनरबाजी करत आहे.

या बेकायदा बॅनरबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून असे बॅनर हटविण्याची कारवाई पालिकेकडून सातत्याने करण्यात येत आहे. यामध्ये ठाणे पालिका क्षेत्रातील एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ अशा ११ महिन्यांच्या कालावधीत ८ हजार १७४ बेकायदा फलक, पोस्टर आणि होर्डींग हटविण्याची कारवाई पालिकेने केली आहे. बेकायदा बॅनरबाजी केल्याप्रकरणी १२५ जणांवर गुन्हे दाखल केले असून त्याचबरोबर १ लाख १ हजार ५० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या वृत्तास ठाणे महापालिकेचे उपायुक्त (अतिक्रमण) शंकर पाटोळे यांनी दुजोरा दिला आहे.

कारवाईची आकडेवारी

प्रभागहटवलेले फलकगुन्हेदंड वसूल
नाकाडा-कोपरी७०५२११००५०
वागळे इस्टेट१२१६१०७००
लोकमान्य/सावरकर नगर९९५१६ १००५०
वर्तकनगर१३१९ १०७००
माजिवडा-मानपाडा७४५ १५४००
उथळसर४७५ १०८००
कळवा१०७१ २८ १०८००
मुंब्रा६९७ २७१२०५०
दिवा९५११११०५००
एकूण८१७४१२५१,०१,०५०