ठाणे :  उपवन येथील गावंड बाग भागात शुक्रवारी रात्री  वाऱ्याने उडून आलेले भलेमोठे लोखंडी पत्र्याचे शेड फूटबॉल टर्फवर कोसळले. या घटनेत टर्फ वर खेळणारी  सात मुले जखमी झाले आहेत. पाच मुलांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून या सर्व मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे शेड परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवरील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यन अय्यर (१५), सिद्धांत रवासिया (१५), अभिज्ञान डे (१५), इथन गोंसालवीस (१५), आयान खान (१५) आणि शुभान करपे (१५) अशी जखमी मुलांची नावे आहेत. यातील शुभान किरकोळ तर  इतर मुले गंभीर जखमी आहेत.

ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. उपवन येथील गावंडबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ आहे. दररोज या टर्फ वर फुटबॉल खेळण्यासाठी मुले येत असतात. या भागातील १७ मुले रात्री फुटबॉल खेळत होती. रात्री ९:३० वाजताच्या सुमारास  एक भालेमोठे लोखंडी पत्र्याचे शेड टर्फ वर खेळणाऱ्या सहा मुलांच्या अंगावर कोसळले. या घटनेत पाच जणांना गंभीर जखम झाली आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळाल्यानंतर त्यांनी मुलांना उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे शेड परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवरील असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

हेही वाचा >>> ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या आराखड्यास मान्यता

या घटनेनंतर शहरात इमारतीच्या गच्चीवर उभारण्यात येणाऱ्या शेडचा मुद्दा उपस्थित होत आहे.  ठाणे शहरात अनेक इमारतीवर शेड उभारण्यात आले  आहेत. इमारतीत होणारी गळती थांबविण्यासाठी हे शेड उभारले जातात.

महापालिकेचे शेड कोसळून दोन जण जखमी

– येऊर येथे ठाणे महापालिकेची शाळा आहे. या शाळेवरही शेड बांधण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी येथील लोखंडी  पत्र्याचे शेड दोन घरावर कोसळले. यात दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे..

हेही वाचा >>> डोंबिवलीत रस्त्यावर सापडलेल्या मतदार ओळखपत्रप्रकरणी ‘बीएलओ’ अधिकाऱ्यांवर गुन्हा

वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान

रात्री पडलेल्या पावसामुळे  ठाणे शहरात ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या वाहनांवर वृक्ष पडल्याने वाहनांचे नुकसान झाले. सखल भागात पाणी साचले होते. अनेक भागात रात्री विद्युत पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. शहरातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. चालक आणि प्रवाशांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता आले नाही.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane news 6 kids injured after tin shed collapses on football ground zws
Show comments