लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे: ठाण्यात सोमवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी गारांचा पाऊस पडला. या पावसामुळे अनेकांचे नुकसान झाले. तर गारांचा पाऊस पाहण्यासाठी काहीजण घराबाहेर पडले होते.
आणखी वाचा- मुंबई आणि आसपासच्या परिसरात पुढील तीन चार तास पावसाचे
राज्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यामुळे सोमवार सायंकाळीपासूनच ठाणे, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागात सोसाट्याचा वारा सुटला. तर रात्री विजांच्या कटकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. रात्री कामानिमित्ताने घराबाहेर पडलेल्या नागरिकांचे हाल झाले. काही भागात गारांचा पाऊसही पडल्या. गारांचा पाऊस पडल्याची माहिती मिळताच अनेकजण गारा वेचण्यासाठी आणि हा पाऊस पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. मंगळवारी ही शहरातील वातावरणात गारवा जाणत होता.