शहापूर : तालुक्यातील विहीगाव खोडाळा मार्गावर असलेल्या अप्पर वैतरणा धरणाच्या पुलाजवळ एका खासगी वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन सुमारे ५०  फूट खोल  कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर चालकासह ८ जण जखमी झाले आहेत.  वाहन धरणाच्या काठावर जाऊन थांबल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कसारापासून १४ किमी अंतरावर असलेल्या माळ गावठा वस्तीतील रेल्वे सेवा निवृत्त कर्मचारी आणि स्थानिक रहिवासी दादू जेठू झुगरे (६९) हे  या अपघातात मयत झाले आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत मंगळवारी पालघर जिल्ह्यातील खोड गावाकडे निघाले होते. विहिगावजवळील वळणावर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट ५० फूट खोल  कोसळले. खालच्या बाजूला अप्पर वैतरणा धरणाच्या काठावर असलेल्या खडकावर जाऊन वाहन आदळले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने जखमींना कसारा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. 

हेही वाचा – ‘एचएमपीव्ही’ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पालिका सतर्क, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विशेष कक्ष तयार

हेही वाचा – डोंबिवलीत सुभाष रस्ता भागात दूषित पाणीपुरवठा, गटारांची खोदाई करताना जलवाहिन्या तुटल्या

चालक सुरेश ठोंबरे यांच्यासह झुगरे कुटुंबातील ७ जण जखमी झाले. सन्या ठाकरे, भारती झुगरे, उषा झुगरे, अती झुगरे, अंकिता झुगरे, आदित्य झुगरे, पातळी झुगरे अशी जखमींची नावे असून यात दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यासह इतर २ जणांवर खर्डी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे, नायब तहसीलदार वसंत चौधरी, पोलीस निरीक्षक सुरेश गावित, मंडळ अधिकारी संदीप चौधरी, पोलीस हवालदार देवेंद्र शिरसाठ, राजेश माळी, पोलीस नाईक उमेश चौधरी, कॉन्स्टेबल जी. एस. बोडके, पंढरीनाथ बोरसे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane one person died and eight others were injured after the vehicle fell into the valley incidents in shahapur taluka ssb