ठाणे : ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री ऑलआऊट मोहीम राबविली होती. या मोहीमेत पोलिसांनी ४१७ सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेतली. तर १० तडीपार गुंडांना अटक करण्यात आली. गावठी कट्टे, सुरे, तलवारी अशी १७ प्राणघातक अवैध शस्त्रास्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी तसेच सण उत्सवांच्या कालावधीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी रविवारी रात्री ११ ते सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत ऑलआऊट मोहीम राबविली होती. त्यानुसार ठाणे आयुक्तालय क्षेत्रात स्थानिक पोलीस, गुन्हे अन्वेषण शाखा आणि वाहतुक पोलिसांचे २३८ अधिकारी ९६२ कर्मचारी ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते.

हेही वाचा : जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”

पोलिसांनी अवैध शस्त्रसाठ्यावर कारवाई केली. त्यानुसार, दोन गावठी कट्टे, चार कोयते, दोन तलवारी, सात सुरे, दोन इतर हत्यार असे एकूण १७ प्राणघातक शस्त्र जप्त केले. तसेच १५ गुन्हे दाखल करण्यात आले असून १२ जणांना अटक केली आहे. अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर ४२ गुन्हे दाखल करण्यात आले असून ३८ जणांविरोधात कारवाई करण्यात आली. ऑक्रेस्ट्रा बारसह ३५९ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या ३८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. वाहतुक नियंत्रण शाखेकडून १०४ वाहन चालकांविरोधात ९३ हजार ३०० रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Story img Loader