ठाणे : देशभरात शेअर बाजार गुंतवणूक तसेच विविध बतावण्या करून नागरिकांची आर्थिक फसवणुक करणाऱ्यांना मोबाईल सीमकार्डचा पुरवठा करणाऱ्या तीनजणांना ठाणे आर्थिक व सायबर गुन्हे विरोधी पथकाने छत्तीसगड येथून अटक केली आहे. या टोळीकडून ७७९ सीमकार्ड जप्त करण्यात आलेले असून त्यांनी यापुर्वी तीन हजार सीमकार्डचा वापर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी वापरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या टोळीने सक्रीय (ॲक्टिवेटेड) सीमकार्ड देशभरासह कंबोडीया, दुबई, चीन तसेच परदेशात सायबर गुन्ह्यांसाठी पुरविल्याची माहिती तपासात पुढे आली असून या गुन्ह्याच्या तपासात देशभरातील आर्थिक फसणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अफताब इरशाद ढेबर (२२), मनिषकुमार मोहित देशमुख (२७) आणि भाईजान उर्फ हाफिज लईक अहमद (४८) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील अफताब आणि मनिषकुमार हे दोघे छत्तीसगडचे तर, हाफिज हा दिल्लीचा रहिवाशी आहे. गेल्या काही महिन्यांत ठाणे पोलिस आयुक्तालयातील वागळे इस्टेट परिमंडळाच्या हद्दीतील १६ सायबर गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये शेअर बाजार गुंतवणूकीतून जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून तसेच काही जणांना भिती दाखवून त्यांची ऑनलाईनद्वारे आर्थिक फसवणुक करण्यात आली असून त्यासाठी तक्रारदारांना समाजमाध्यमाद्वारे वेगवेगळ्या लिंक पाठविण्यात आल्या होत्या. या सर्व गुन्ह्यांचा एकत्रित तपास करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुम्बरे यांनी दिले होते.

Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
PM Vidyalakshmi Scheme
उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांना मिळणार १० लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज; काय आहे ‘पंतप्रधान विद्यालक्ष्मी योजना’?
fraud of 19 lakh with youth by cyber thieves
पुणे : सायबर चोरट्यांकडून तरुणाची १९ लाखांची फसवणूक
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Excessive expenditure on ST Bank employees But members of bank still did not get dividend
एसटी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर लाखोंची खैरात, सभासदांना ठेंगा; कर्मचारी संघटना म्हणते…

हेही वाचा…ठाणे : ऐन पावसाळ्यात ठाणेकरांपुढे कचरा समस्या, वाहनांसह प्रकल्प बंद पडण्याबरोबरच कोंडीमुळे नियोजन बिघडल्याचा प्रशासनाचा दावा

त्यानुसार ठाणे आर्थिक व सायबर गुन्हे विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके, पोलिस निरिक्षक प्रियंका शेळके, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण आणि प्रदिप सरफरे यांच्या पथकाने या गुन्ह्यांचा तपास सुरू केला. त्यामध्ये ३० मोबाईलमधून वेगवेगळ्या राज्यातील २६०० मोबाईल सीमकार्डद्वारे व्हॉट्सॲप छत्तीसगड, त्रिपुरा आणि इतर ठिकाणाहून सक्रिय होत असून त्याचा आयपी हा हाँगकाँग येथील असल्याची पथकाला तांत्रिक तपासादरम्यान मिळाली. तसेच या सीमकार्डद्वारे नागरिकांना फसणुकीसाठी ज्या मोबाईलमधून कॉल करण्यात आले, त्याच्या आयएमईआय क्रमांकाचा पथकाने तपास केला असता, ते छत्तीसगड येथील असल्याचे उघड झाले. यानंतर पथकाने तेथे जाऊन अफताब आणि मनिष या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ७७९ मोबाईल सिमकार्ड, १ लॅपटाॅप, २ वायफाय राऊटर, २३ मोबाईल, ५० क्रेडीट आणि डेबीट कार्ड, २० चेक आणि पासबुक जप्त करण्यात आली आहेत. या दोघांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पथकाने दिल्लीतून हफिजला अटक केली, ठाणे आर्थिक व सायबर गुन्हे विरोधी पथकाचे पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

सीमकार्ड खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची दिशाभुल करून कंपनीचे काही प्रतिनिधी त्यांच्या नावाने दोन ते तीन सीमकार्ड खरेदी केली जातात. त्यापैकी एक सीमकार्ड त्यांना दिले जाते तर इतर सीमकार्ड स्वत:कडे ठेवून त्याची विक्री करतात. या गुन्ह्यातही असाच प्रकार समोर आला असून मोबाईल कंपनीचे तीन प्रतिनिधी पोलिसांच्या रडारावर आले आहेत. अफताब आणि मनिष या दोघे मोबाईल कंपनीच्या प्रतिनिधींकडून सीमकार्ड घेऊन ते देशभरात आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्यांना एक ते दीड हजार रुपयांना विकत होते. तसेच हाफिज हा या दोघांकडून सीमकार्ड खरेदी करून ती दुबई येथे आर्थिक फसवणुकीचे गुन्हे करणाऱ्यांना विक्री करत असल्याची बाब तपासात समोर आली आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

हेही वाचा…विश्लेषण : नवे ठाणे रेल्वे स्थानक महत्त्वाचे का? ते कधी कार्यान्वित होणार?

या टोळीने रायपुर, विलासपुर आणि दिल्ली येथील सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या संपर्कातून सक्रिय सीमकार्ड कंबोडीया, दुबई, चीन आणि इतर देशात सायबर गुन्ह्यांसाठी पुरविल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या टोळीने यापुर्वी तीन हजार सीमकार्डचा वापर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांसाठी वापरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या क्रेडीट आणि डेबीट कार्ड, चेक आणि पासबुकच्या तपासामध्ये ५ ते ६ बँक खात्यांचा गुन्ह्यासाठी वापर करण्यात आला असून याबाबत राजस्थान, हरियाणा, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, केरळ येथील पोलिस ठाण्यांमध्ये १४ तक्रारी दाखल असल्याचे तपासात पुढे आल्याचे उपायुक्त मणेरे यांनी सांगितले.