गेल्या काही दिवसांपासून बाईक आणि रिक्षा चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. मानपाडा पोलिसांनीही आपल्या कारवाईत एका सराईत चोरटयाला अटक केली. गस्त घालत असताना पोलिसांना दुचाकीवरून जाणाऱ्या एका व्यक्तीचा संशय आला. पोलिसांनी त्याला थांबवले अन् कागदपत्रांची विचारणा केली, तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरं दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. अधिक चौकशी केली असता तो अट्टल दुचाकीचोर असल्याचं समोर आलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाडया चोरायच्या आणि त्या पोलिसांच्या हाताला लागू नये म्हणून इराणी वस्तीत ठेवायच्या अशी आयडिया हा चोर वापरत होता. महेश उर्फ बाबू उर्फ पद्या साळुंखे असे या चोरट्याचं नाव असून तो कल्याणनजीक असलेल्या खडवली परीसरात राहतो. वयाच्या १६ व्या वर्षांपासून त्याने चोरी करायला सुरुवात केल्याची माहिती देखील समोर आली. त्यामुळे महेश कडून अधिक गुन्ह्यांची उकल आणि गाड्या हस्तगत होण्याची दाट शक्यता आहे.

लॉक असलेल्या गाड्याच्या तो थेट वायर कापत होता आणि गाड्या चोरत होता. पोलिसांनी त्याच्याकडून मानपाडा, उल्हासनगर ,बदलापूर शिवाजीनगर नारपोली, मुंब्रा , विलेपार्ले पोलीस ठाण्यातील एकूण दहा गुन्ह्यांची उकल केली आहे. ९ मोटरसायकल एक रिक्षा जप्त केली आहे. चोरलेल्या सर्व गाड्या त्याने घराच्या मागील बाजूस लपून ठेवल्या होत्या. गिऱ्हाईक मिळाल्यावर तो या गाड्या विकणार होता .डोंबिवली पूर्वेकडील युनियन चौक परिसरात मानपाडा पोलिसांची पेट्रोलिंग सुरू असताना महेशला हटकण्यात आले आणि एक सराईत चोरटा पोलिसांच्या हाती लागला