दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी गेल्या काही दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थातच एनआयएन आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरात छापे टाकत पीएफआयच्या (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) अनेक कार्यकर्त्यांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी छापे टाकत काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. राज्यात सोमवारी मध्यरात्रीही आणखी काही ठिकाणी छापे टाकण्यात आली असून पीएफआयच्या आणखी काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा… पीएफआयच्या कार्यकर्त्यांची एनआयएकडून धरपकड, मध्यरात्री औरंगाबाद-सोलापुरात मोठी कारवाई
दरम्यान मुंब्रा, कल्याण आणि भिवंडी ठिकाणी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा आणि ठाणे परिमंडळ एकने सोमवारी मध्यरात्री छापे टाकत कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमध्ये दोन जणांना मुंब्रामधून ताब्यात घेतलं आहे, तर भिवंडी आणि कल्याणमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. या चार जणांचा पीएफआयशी काय संबंध होता, नेमका काय सहभाग होता हे अजून स्पष्ट झालेलं नाही.