ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावर पाणी फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि त्यांच्या समर्थकांना पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण करणाऱ्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता हा लाठीचार्ज करण्यात आला. यादरम्यान दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे श्रीनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

वागळे इस्टेट येथील किसनगर विभागातील भटवाडी परिसरात ठाकरे गटाचे संजय घाडीगावकर यांच्या माध्यमातून सोमवारी रात्री एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे ही उपस्थित होते. त्यावेळी शिंदे गटाचे शेकडो कार्यकर्ते त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरूवात केली. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडूनही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
maharashtra election 2024 yogi adityanath fact check viral video
भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ बुलडोझर घेऊन उतरले मैदानात! लोकांना हात जोडून केलं मतदानाचं आवाहन? Video खरा पण…
Loksatta lokrang A review of the achievements of Maharani Baijabai Shinde
दखल: बायजाबाई यांच्या कर्तृत्वाचा आढावा
ss mp shrikant shinde
“चोवीस तास उपलब्ध राहणाऱ्या आमदाराचा विचार करा”, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन
Shrikant Shinde vs mns raju patil
कल्याण ग्रामीणमध्ये श्रीकांत शिंदे – राजू पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला

ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; दोन्ही गटाकडून परस्पर गुन्हे दाखल

यादरम्यान एकनाथ शिंदे समर्थकांनी ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यासंदर्भाचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारितही झाले होते. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. ही प्रक्रिया संपवून विचारे मंगळवारी पहाटे चार वाजता पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर बाहेर जमलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांपैकी एकाने पाणी फेकण्याच्या प्रयत्न केला. तसेच विचारे यांच्यासोबत असलेल्या पदाधिकाऱ्यांना मारहाण देखील केली.

यानंतर पोलिसांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या दरम्यान दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यामुळे श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.