मुंब्रा येथे राहणारी ६० वर्षीय महिला अचानक घरातून १९५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन बाहेर पडली आणि ते दागिने एका ठिकाणी विसरली. पंरतु ठाणे पोलिसांच्या अथक प्रयत्नाने या महिलेकडून गहाळ झालेले सर्व सोने पोलिसांनी परतवले. पोलिसांच्या या कार्याचे कौतुक महिलेचे पती आणि त्यांचे नातेवाईक करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंब्रा येथील तन्वरनगर भागात वयोवृद्ध महिला राहते. १२ डिसेंबरला दुपारी अचानक त्या घरातून बाहेर पडून कुठेतरी निघून गेल्या होत्या. या घनटेनंतर महिलेच्या पतीने याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे,याप्रकरणी त्या हरविल्या असल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान, याप्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा एकच्या पथकाकडून सुरू होता. युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीलीप पाटील, पोलीस निरीक्षक कृष्णा कोकणी यांनी याप्रकरणाच्या तपासासाठी पथके तयार केली. तपासावेळी महिला घरातील १९५ ग्रॅम वजनाचे आणि ११ लाख रुपयांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घरातून घेऊन निघून गेल्याचे समोर आले. तसेच महिलेची मानसिक स्थितीही स्थिर नसल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली. त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला असता, ती दुसऱ्या दिवशी रात्री तिच्या ठाण्यातील उथळसर येथील नातेवाईकांच्या घरी गेल्याचे निष्पन्न झाले.

हेही वाचा >>> ठाणे पश्चिम स्थानक परिसरातील फेरीवालामुक्त करा; महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश

तिच्या नातेवाईकांनी याची माहिती महिलेच्या पतीला दिल्यानंतर पोलिसांच्या पथकाने महिलेला ताब्यात घेतले. तसेच तिची विचारपूस करून तिच्याकडील दागिन्याबाबत माहिती घेतली. परंतु तिला काहीच सांगता येत नव्हते. दागिन्यांच्या तपासासाठी पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे पसरविले. त्यावेळी ही महिला १३ डिसेंबरला दुपारी ऋतु पार्क येथील एका दुकानाजवळ बसून होती, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले त्यावेळी तिची सोन्याच्या दागिन्यांनी भरलेली पिशवी एका व्यक्तिला आढळून आल्याचे चित्रीकरण दिसले. त्यानुसार पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याकडील दागिने घेतले. हे सर्व दागिने पोलिसांनी महिलेच्या पतीला दिले. दागिने परत मिळताच महिलेच्या पतीने पोलिसांचे आभार मानले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police returned all the gold which was missing by 60 year old woman living in mumbra zws